पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अमलांत न आणण्याचा क्रम कारभारी मंडळीने चालू ठेविला. ते बोलण्यांत व लिहिण्यांत मात्र गोड शब्दांची योजना करीत. आपल्या सूचनांप्रमाणे सर्व सुधारणा चाल केल्या आहेत, लवकरच सर्व घोटाळे नाहीसे होतील) असे जबाब पाठवून इंग्रजसरकारचें मन नरम पाडण्याचे इलाज चालले होते. पुढे मल्हारराव महाराजांचा व कर्नल फेयरचा जम बरोबर बसेना. नंतर कर्नल फेयर बदलून सर लुईस पेलि हे स्पेशल कमिशनर होऊन आले. त्यांनी तारीख ३० नोवेंबर सन १८७४ रोजी बडोदें राज्याचा चार्ज घेतला. नंतर त्याच साली विषप्रयोगाचे प्रकरण उपस्थित झाले. विषारी सरबत कर्नल फेयरच्या पोटांत शिरले. या कृत्यांत मल्हारराव महाराजांचे अंग असावें असा संशय येऊन त्यांना कापांत नेऊन प्रतिबंधांत ठे. विलें, व गायकवाडांच्या राज्यावर इंग्रजसरकारची जप्ति बसली. या प्रकरणाची चौकशी करण्याकरितां हिंदु- स्थान सरकाराने एक जंगी कमिशन नेमलें. त्याची साद्यंत हकीकत कळविण्याची ही जागा नाही. विषप्रयोगाचा आरोप मल्हाररावांवर शाबीत झाला नाही. ते त्या आरोपांतून अ. गर्दी मुक्त झाले, तरी एकंदरीने ते राज्याधिकार चालविण्यास लायक नाहीत असें ठरवून, त्यांना कायमचे पदच्युत केले, त्यांच्या औरस वंशाकडे सुद्धा गादीचा हक्क न ठेवता त्यांना ता. २२ एप्रील १८७५ रोजी बडोद्याहून अचानक उचलून मद्रासेस नेऊन ठेविलें. मल्हाररावांचें चार वर्षांचे शि- राळ-शेटी राज्य संपले. नंतर सर लुईस पेली जाऊन सर रिचर्ड मीड ता.१० एप्रील १८७५ रोजी एजेंट होऊन आले,