पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३०] आतां पुण्याकडचे वर्तमान एकीकडे ठेवून मासाहेबांचे पाय पुनः बडोद्याला कसे लागले, हे कळण्यासाठी मल्हा- रराव महाराजांची थोडीशी हकीकत अगोदर सांगतो. थोरले सयाजीराव महाराज यांचे तिसरे चिरंजीव मल्हारराव महाराज, खंडेराव महाराजांच्या मागें, सन् १८७१ साली, गादीचे मालक झाले. ते उतावळ्या स्वभावाचे; पण, साधे भोळे व भाबडे होते. औदार्य गुणांत गणपतराव महाराज व खंडेराव महाराज यांना ते मागें सारण्यासारखे होते. त्यांना छक्के पंजे व राजकीय डाव पेंच माहीत नव्हते. तें शिक्षण त्यांना कधीच मिळाले नव्हते. कोण काही सांगेल तेच खरें मानून चालणारे होते. ते गादीनशीन झाल्यावर राज्यांत घोटाळे झाले. स्वार्थसाधु लोक त्यांच्या सर्भोवती गोळा झाले. निकट सहवासाने त्यांच्यावर त्यांचा पगडा बसला. राज्यकारभार पाहणाऱ्या बारभाईवर को. णाचा दाब राहिला नाही. हीच व्यवस्था त्यांना घातुक झाली. इंग्रजसरकाराकडे त्यांचे बोभाटे जाऊ लागले. हलकट लोक दूर करून चांगला हुशार पुरुष दिवाणाच्या जागी नेमून त्याच्या धोरणाने व साह्याने राज्यकारभार चालवावा, अशा तिकडून सूचना झाल्या. शेवटी सुधारणा करण्यासाठी सार्वभौम सरकाराने त्यांना अठरा महिन्यांची मुदत दिली. सरकाराने कधीं गोंजारून, कधी धमकी देऊन, कधी तारीफ करून, कधी दरडावून, कधी रागें भरून लिहिलेल्या खलित्यांवर खलीते एजेंट मार्फत पाठविले, तरी त्या सुचनांकडे त्यांनी द्यावे तसे लक्ष दिले नाही. युक्तीने, प्रयुक्तीने व शिताफीने इंग्रजसरकारच्या सूचना