पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२९] खंड ८, RDS 'एथे जे जे वाढे तितुके मोडे। साचे त्याचा वेच घडे॥' पुणे मुक्कामी ताराबाबाला मांडीवर घेऊन व थोपटून थोपटून मासाहेब निजवीत असतील, व ती झोपी गेल्यावर तिच्या मुखाकडे पाहून त्यांच्या मनांत आपल्या गतवैभवाचे विचार उभे राहात असतील, त्यावेळचे त्यांचे चित्र एका कवीच्या कवनांत चांगले वठले आहे, तें असें:- 'बाळकाचे पाहे मुख। . केवळ चित्सुखाचे निजसुख । कैवल्य प्राप्तीचा जो हरिख।। त्याहून संतोष पावली ॥१॥ हनुवटी धरुनि पाहे वदन। क्षणक्षणां गल्लस्पर्शन । सप्रेम उचलोनि दे चुंबन। र कलभाषिणी रंजविते ॥२॥ कजलें माखले नेत्र पुशी। शकुंतल, कुंची, टोपी, सरसी। करूनि आलिंगी हृदयेशी। चुंबी वदनासी क्षणक्षणां ॥३॥' ही सहृदय रचना चतुर चिताज्यालासुद्धा हुबेहुब चिता. रता येणार नाही, असो. ताराबाबाचे गोजिरवाणे मुख, बोबडे बोल व बाललीला पाहून मासाहेबांना हर्षवायु होत असेल, कन्या सरासरी साडेचार वर्षांची होऊन चांगली चालूं बोलू लागली होती.