पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ अगोदरच मरण पावली होती. चुलते दौलतराव काका, माने बाळासाहेब घाटगे, आण्णासाहेब व तात्यासाहेब माने हे दोघे बंधू व दुसरी चाकरमाणसें, इतकीच कायती त्यांच्याजवळ होती. वडील बंधु आण्णासाहेब बरेच प्रौढ होते. धाकटे तात्यासाहेब माने अद्यापि वयांत आले नव्हते. दासदासींचा भरणा बडोद्यांतच राहिला. काही बाळमैत्रिणी होत्या त्यासुद्धा बरोबर नेता आल्या नाहीत. अशा स्थितीत पु. ण्यांत गद्यांच्या वाड्यांत राहून मासाहेब दिवस लोटीत होत्या. ताराबाबा मातुश्रीच्या सौंदर्याची हुबेहुब प्रतिमा होती. ती अंगापिंडाने बरीच गुटगुटीत होती. पुण्यास जाऊन राहिल्यावर मासाहेबांना बडोदें रात्रांदिवस डो. ळ्यापुढे दिसत होते. स्वनाम, स्वजन, व स्वकीय, यांमध्ये मो मोहकपणा असतो तो सांगता येत नाही. तो बडोदें सोडल्यापासून बऱ्याच अंशी नाहीसा झाल्याने त्यांच्या मनाला वारंवार दुःख होत असे. ENERAL LIB347 GGENE सार्वजनिक वाचा खेड, ( .)