पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२७ महाराजांच्या मागें तोच गादीचा वारस झाला असता; पण, तसा योग घडून न आल्यामुळे, मल्हाररावांना गादीचा पुरा अधिकार मिळाला.METROPRI ETS - अशा स्थितीत यापुढे बडोद्यास राहून आपला निभाव लागावयाचा नाही, बडोद्यापासून दोन पावले दूर राहावे, असा विचार करून, ताराबाबाला सुमारे ६ महिने झाल्या. वर रेसिडेंटाच्या संमतीने तिला बरोबर घेऊन त्या पुण्यास जाऊन राहिल्या. पुण्यास चालत्या झाल्या त्यावेळेस त्यांच्या अंगावर होता तेवढाच दागदागिना त्यांजपाशी राहिला. दुसरे चडजवाहीर त्यांस काही मिळाले नाही. त्यांना लाख रुपये स्त्रीधनाबद्दल मल्हारराव देण्यास तयार झाले होते; पण, ते त्यांनी घेतले नाहीत. पुण्याचा चालू खर्च पुरा पाडण्यासाठी त्यांना सावकाराचें घर बघावे लागले, शेवटी एजंटमार्फत पत्रव्यवहार चालून त्यांना सालींना छ. त्तीस हजार रुपये बडोद्याच्या खजिन्यांतून मिळावे असे ठरले. पुण्यास गेल्यावर इंदूरचेमहाराज तुकोजीराव होळ- कर मासाहेबांचा चांगला परामर्ष घेत होते. तिकडे गेल्यावर पुनः आपले पाय बडोद्याला लागतील, पुनः आपल्या वंशाकडे राज्याधिकार येईल, असें मासाहे. बांच्या स्वप्नीही आले नसेल; पण, ईश्वरी सूत्र कांही निरा- ळेच असते. ते कोणाला आधी कळत नाही. पुण्यास त्यांना सुमारे चार वर्षे मोठ्या कष्टांत काढावी लागली. तेथे त्यांना ताराबाबाशिवाय करमणुकीला दुसरें साधन नव्हतें. वडील अप्पासाहेब माने व मातुनी बजूबाई ही