पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येथे राहिल्याने कोणता घात व काय तुफान होईल हे समजत नाही. याजकरितां मजकुर हा सरकारांस कळविका आहे. याबद्दल सत्वर तजवीज करणे साहेबांकडे आहे. ता. १ माहे जुलै सन १८७१ रोजी बडोद्याहून रवाना झाली आहे. आषाढ शु० १४ शके १९२७. जमनावाईसाहेब गायकवाड. या पत्रांवरून मासाहेब गरोदर स्थितीत असतांना किती संकटांत होत्या हे चांगले कळून येईल, असो. मासाहेबांना कंवठ फार आवडे. गर्भारपणी एकदां ए. कामें एक इरसाल पिकलेले कवठ आणून नजर केले. ते मारळाएवढे मोठे होते. तें वरून सबंध दिसत असून फूट त्याची निशाणी नव्हती. त्यावेळेस जवळ एक भरवं. शाचा मनुष्य बसला होता. त्याला त्या कंवठाचा संशय आला. फोडून पाहिले तो खरोखरच त्यांत विषप्रयोग झाला होता असे दिसून आले. तेव्हापासून त्यांच्या जिवाला अपाय करण्याचे इलाज चालू असल्याची खातरी झाली. यापुढे राजवाड्यांत राहणे सुरक्षित नाही, धोक्याचे आहे, असे समजून ही गोष्ट रेसीडेंटाच्या कानावर घालून त्या कापाच्या हद्दीत रोसिडेंटाच्या आश्रयाखाली सन् १८७१ ध्या मार्च महिन्यांत जाऊन राहिल्या. कापांत पूर्ण मास भरतांच, संवत् १९२८ आषाढ वद्य ६ (तारीख ६ जुलाई १८७१) या दिवशी, प्रातःकाली, मासाहेब प्रसूत झाल्या; पण, इच्छिल्याप्रमाणे त्यांस पुत्र न होतां कन्या झाली, त्या कन्येचें नांव ताराबाबा असें ठेविलें. पुत्र होता तर खंडेराव