पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येणेप्रमाणे सात कलमी मजकूर ध्यानात आणून लियाचा तोंडी बंदोबस्त नामदारसाहेबांकडून करून ध्यावा. दिवस गत होऊ नये. विशेष लिहून कळविलें पाहिजे असे नाही. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना. त 2022 जमनावाईसाहेब गायकवाड. 1STF-PTET यादी मेहरबान गव्हरनरसाहेब बहादर, जंजीरें मंबई. यांजकडे जमनाबाईसाहेब राणी, संस्थान बडोदें, यांजकडून लिहून जाते ऐसाजे-पूर्वी आमचे तर्फेने सर्व मजकूर सरका- रास जाहिर केल्यावरून सरकारांनी विचार करून आम्हांस कापांत आणून ठेऊन बंदोबस्त केला. त्यावरून मल्हाररा- वदादासाहेब यांणी आपल्या तर्फेनें राधाबाई व रेखूबाई यांस ठेविल्या आहेत, असे असून हल्ली दादासाहेब स्वतः फौजेसुद्धा तोफा, वगरे सरंजाम घेऊन आम्ही ज्या बागेत आहोत त्याच्या खाडीच्या पलीकडे अदमासे दहा हातांवर राहिले आहेत. हे आम्हांस फार त्रासदायक आहे, कारण इंग्रजसरकारांनी सर्व बंदोबस्त ठेऊन त्यांचे भरंवशाच्या राधा. बाई व रेवबाई असा हरदूकडील पक्का बंदोबस्त असून पुन्हां स्वतः फौजेसहित येऊन राहतात. हे लोकांत अप- कीर्तीस कारण होऊन लोकांत उपहास होण्याची गोष्ट आहे, व बाळंतपणाचे वेळेस अशा तजविजी कधींच झाल्या नाहीत, आणि दादासाहेब तोफा व लष्कर घेऊन राहिले, तेव्हां त्यांचे मनांत येथे राहून काय कर्तव्य आहे हे समजत नाही; याजकरिता सरकारांनी याचा अवश्य विचार करून बंदोबस्त झाला पाहिजे. नाहीपेक्षा महाराज