पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२४] पाठविण्याची लवकर तजबीज करावी, व त्याजला रेसिडेंटसाहेब यांणी कामकाजात वागविण्यास हरकत करूं नये अशा बंदोबस्तासह पाठवून द्यावा. जाम १ इकडील आमचे सर्व उपाय थकल्यामुळे सर्व आमची हिंमत गेली, परंतु आपण नामदारसाहेबांपाशी माफी मागन तोंडी अर्ज करून लवकर खुलासे कराल. इकडेस लक्ष लागून राहिले आहे. इनसाफी राज्यांत या हकीकती एकदम खन्या मानण्यास अडचण पडा- वयाची, परंतु मल्हारराव आल्यापासून आजपर्यंत केलेली कामें मनांत आणिल्याने विशेष खात्री होईल. १ पूर्वी आपल्यास आणावयाकरितां इकडोन रावजी केशव सांभारे यांस पाठविला, असें असून त्या आदावतीमुळे त्याजवर खोटी तकरार चालून रेसिडेंटसाहेद यांणी मल्हारराव यांचे स्वाधीन करून दिला. त्याजवर सर्व खोटें झाले. से सर्व कागदपत्र तयार बनावटीचे केले आहेत. आता या कारणाने मजका बडोदें येथील कोणी मनुष्य जीवाच्या भीतीस्तव अनुकूळ होत नाहीत, व हल्ली मजजवळ आहेत तेही बेदील झाले आहेत. या ठिकाणी केवळ मोंगलाई झाली आहे. याजकरितां सदर रावजी यास लवकर सोडण्याची तजवीज आपके अंगावर न येतां करावी. यापासून आपला लौकिक होणार आहे. याचप्रमाणे अजम वाकरअल्ली मीरसाहेब यांचाही प्रकार आहे. तसाच हरी वैद्य माहोलीकर याचाही प्रकार सर्व आपल्यास कळलाच आहे.