पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५२२] PRATAP श्री.जाणी की तीर्थस्वरूप राजश्री दौलतराव काकासाहेब माने, न वडिलांचे सेवेशी. बाळके जमनाबाईसाहेब गायकवाड बडोदकर, कृतानेक दंडवत विज्ञापना ता. जेष्ठ शु० १४ शके १७९३ पावेतों मुक्काम बडोदें येथें यथास्थित असो विशेष-इकडील मज- कुराचे पत्र तारीख २७ माहे मेचे पोस्टपेड डाकमार्गे पाठविले आहे. तें पावून मजकूर सविस्तर कळला असेल. स्याचा जबाब कांहीं न आल्याकारणांनी पुन्हां या पत्रा- बरोबर आमचे सहीची यादी पाठविली आहे, ती तुम्ही समक्ष नामदार गव्हरनरसाहेब बहादुर यांस द्यावी, आणि तोंडी मजकूर खाली लिहिल्याप्रमाणे कलमवार कळवावा, तो येणेप्रमाणे:- १ मेहेरबान कोलसाहेब यांस आमचेकडील सर्व हकी- कतीचे कलमांची माहिती असून त्यांस अधिकार नस- ल्याकारणांनी त्यांच्यांनी काही कमी जास्त करवत नाही. तारीख २७ माहे मे रोजी मातोश्री आईची प्रकृति बिघडली म्हणून शहरांत गेल्या. त्याच रोजी मल्हारराव यांस खोटी खबर लागली, तेव्हां त्यांची स्वारी फार जलदीने येत असतां रस्त्यांत चार मनुष्ये फार जखमी झाली. ती वांचतील असे वाटत नाही, तेव्हां त्या समयास कोठे तुफान होईल तें सांगवत नाही. १ हल्ली मल्हारराव राज्यावर असून लोकांस देणग्या व इनाम पालख्या वगैरे देण्याचे स्वाधीन असल्याने, व