पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२१ किंवा पाय पलंगाखाली घसरलेला पाहिला की, तो तो हळूच तोंडाने वर उचलून ठेवी. मांजरें आपली पिके तोंडांत धरून कशी नेतात हे सर्वांनी पाहिलेच आहे. तशीच माया कुत्र्याच्या जातीलाही असते. मोत्या कुत्रा आपल्या धनिनीची चाकरी इतक्या शिताफीने करी की, मासाहे- बांना ती कळू देत नसे, व त्यांची झोपमोडही होत नसे. त्याची धनीण त्याच्या अंगावरून ममतेने हात फिरवी, अंजारून गोंजारून मोत्या, मोया करी, त्याचे मुके घेई, व वेळच्या वेळेस त्याच्या पोटाला भाकर घाली, एवढेच उपकार स्मरून तो आपली लांब जीभ बाहेर काढून आ- पल्या धनीणीपाशी शेपूट हालवीत बसे. संकटकाली त्याने आपल्या धनीनीची अशी इमाने इतबारे नोकरी बजाविली. चालत्याकाळी गोंडा घोळणारी माणसें पुष्कळ असतात; पण, अशी एकनिष्ट सेवा करणारी माणसे थो- डीच सांपडतील. हा इमानी कुत्रा मासाहेबांजवळ पुण्यासही काही दिवस होता. पुढे त्याने त्यांच्या पायांजवळच देह ठेविला. ही मोत्या कुत्र्याची गोष्ट मासाहेबांच्या सन्निध रहाणाज्या एका गृहस्थाकडून कळली. मासाहेब गरोदर असतांना कापांत जाऊन राहिल्या होया. त्यांसमयी त्यांचे चुलते दौलतराव काका माने मुंबई- कडे होते. त्यांच्या मार्फत मुंबई सरकाराशी त्यांचा खासगी पत्रव्यवहार चालू होता. त्यापैकी त्यांची स्वदस्तुरची दोन अस्सल पत्रे मिळाकी ती याखाली देतो:-