पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याला बुद्धि नाही, ज्ञान नाही, काही नाही. तरी तो आपला अंमल पृथ्वीवर किती गाजवितो पाहा! त्याची सत्ता सर्वत्र ईश्वरासारखी चालते. आता सर्व व्यक्ति त्याला भुलणान्या आहेत असे नाही. त्याला लाथ मारणाच्याही कांही विभूति आढळतात; पण, अशा सत्यनिष्ट विभूति फार विरळा. तशी काही स्वामिनिष्ठ माणसें मासाहेबांच्या सन्निध होती, ह्मणूनच त्यांचा निभाव लागला. आता त्या कृष्ण- कारस्थानांची सगळी हकीकत कळल्यापासून कोणाचा काही फायदा नाही व विषयांतर होतें, सबब ती येथें गा- ळून टाकिर्तो. त्यावेळेस मासाहेबांच्या जिवाला जपणारा एक मुका प्राणी होता. तो मार्गे सांगितलेला मोत्या कुत्रा होय. तो त्यांना सोडून एक पळभरही एकीकडे राहत नसे. त्याची मासाहेबांना रात्रंदिवस करमणूक असे. तो त्यांच्या- पासून कधीही दूर रहात नसे. खंडेराव महाराज कै. झाल्यावर त्यांचा मुक्काम सुमारे चार महिने राजवाड्यांतच होता. मल्हा- रराव महाराज राज्यकारभार पाहूं लागले होते. मासाहेबांच्या गर्भाला सहामहिने झाले होते. रात्री त्यांच्या निजावयाच्या पर्क- गाजवळ मोल्या कुत्र्याचा खडा पाहारा असे. तो सर्व रात्रभर जागा असे. रात्री दिवाणखान्यांत कोणाची चाहूल लागली की, तो मोठयाने गुरगुरून भुंकू लागे. अनोळखी मनुष्य पलं. गाकडे येऊ लागला की, तो त्याच्या अंगावर वाघासारखा धावे. झोपेत मासाहेबांचा हात, किंवा पाय उघडा पडलेला दिसला की, त्याजवर तो तोंडाने हळूच पांघरूण घाली. हात