पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पर्यंत ती त्याला आळीपाळीने भोगावी लागतात, ती टा. ळण्याचे कोणाच्या हाती नाही. या ह्मणण्याची सत्यता घडोघडी सर्वांच्या अनुभवास येते, 1 खंडेराव महाराजांना पुत्रसंतान नसल्यामुळे गादीचा वारसा त्यांचे कनिष्ट बंधु मल्हारराव महाराज यांजकडे आला. सबब इंग्रजसरकारच्या संमतीने ते लागलेच राज्य- कारभार पाहू लागले. त्यावेळेस बडोद्यास कर्नल बारसाहेब रेसिडेंट होते. मासाहेबांना त्यावेळेस काही दिवस गेले होते. सुमारे दोन महिन्यांच्या त्या गरोदर होत्या. सहा महिने गर्भाला होई- पर्यंत त्या राजवाड्यांतच होया. त्यांना पुत्र होता तर गादी- चा हक्क मल्हारराव महाराजांना मिळण्यासारखा नव्हता. खंडेराव महाराज व मल्हारराव महाराज या उभयतांमध्ये वैमनस्य होते, यामुळे मासाहेबांच्या जीवाला अपाय हो- ण्याची भीति होती. गरोदरस्थितीत वाड्यांत त्यांना पुष्कळ संकटे भोगावी लागली. विरुद्ध पक्षाकडून, विष. प्रयोग, गर्भपात प्रयोग, इत्यादि भयंकर प्रयोगांचे यत्न चालू होते. त्या मुळी गरोदरच नाहीत अशाही कंड्या रोसिडेंटापर्यंत गेल्या. दुसरेही कित्येक भलभलते आरोप व नीच कुभांडांची कृष्णकारस्थाने बाहेर पडूं लागली, तेव्हां मासाहेबांच्या खास तैनातीला मनुष्ये होती त्यांचाही भरंवसा वाटेना. अशा प्रसंगी पैशाच्या लालचीने मागचा पुढचा विचार न करितां कोण कसें वर्तन करील याचा नेम राहत नसतो. खरे पाहिले तर पैसा. हा मातीचेच सख्खे भावंड आहे. त्याला बोलता येत नाही व चालतां येत नाही.