पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१] mP खंड ७. PIPEDकताचे दिवस. खंडेराव महाराजांच्या औदार्याच्या अनेक आख्याइका लोकांच्या तोंडी आहेत. त्या सर्व एथें देण्यास अवकाश नाही, या गोष्टी मासाहेबांच्या नजरेपुढे वरचेवर घडत होत्या; यामुळे, ते वळण त्यांनाही लागत चालले होते. पतिपत्नित्वाचा संबंध दीर्घकालपर्यंत भोगावयास मि- ळावा अशी सर्व दंपत्त्यांची इच्छा असते, व तदनुरूप सर्वत्र उद्योग चालू असतो; पण, तसे घडून येणें मात्र कोणाच्या स्वाधीन नसते. या राजदंपत्त्याचे प्रेम दिवसें- दिवस वाढत्या प्रमाणावर होते; पण, तो सौख्याचा काल फार दिवस टिकला नाही. पांच सहा वर्षे गेली न गेली तोच त्या सौख्याला खो आला. तारीख २८ नोवेंबर, सन १८७०, ( संवत् १९२१, मार्गशीर्ष शु.६) यादिवशी मकरपुन्याच्या राजमहालांत खंडेराव महाराज एकाएकी कैलासवासी झाले. त्यांचा कुलस्वामी श्री खंडेराय याचा जयंतीचा दिवस चंपाषष्टी; त्याच दिवशी त्यांना मरण आले. त्यावेळेस खंडेरावांची उमर सुमारे ४५ वर्षांची होती. आणि मासाहेबाचे वय विसाच्या आंतच होते. अशा अ- त्पवयांत त्यांजवर हा दारुण प्रसंग ओढवला. एका इंग्लिश कवीने झटले आहे की, मनुष्यप्राणी हा घड्याळांतल्या आंदोलकासारखा आहे, त्याच्या एका बाजूला सुख आणि दुसऱ्या बाजूला दुःख आहे, आंतील यंत्र चालू असे.