पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१७] महाराजांना आवडणारे खाण्याचे पदार्थ स्वतः आपल्या हाताने कधी कधी करण्याची त्यांना हौस असे. स्वतः केलेले पदार्थ महाराजसाहेबांना त्या स्वतः वाढीत. आचारी स्वयंपाक करूं लागला ह्मणजे जवळ बसून त्याजकडून पदार्थ करवीत. अशी त्यांची टापटीप, दक्षता, मर्यादा व हौस असे. नित्य कथा कीर्तन, पुराणश्रवण, पूजाअर्चा, दानधर्म, यांत त्यांचा बराच वेळ जात असे. खंडेराव महाराजांपाशी दोन उत्तम जातिवंत कुत्रे होते. त्यांपैकी एकाचे नांव मोत्या व दुसऱ्याचे नांव जड्या होते. त्या कुत्र्यांच्या शुश्रुषेकरितां व खुराकीसाठी दरमहा बरीच मोठी नेमणूक होती. मोत्या कुत्रा मासाहेबांना फार आवडे. तो महाराजांनी त्यांना दिला होता. त्या कुत्र्याला त्यांचा लळा फार असे. या मोत्या कुत्र्याच्या स्वामिनिष्ठेविषयी थोडीशी हकीकत आहे ती पुढे सांगण्यांत येईल. खंडेराव महाराजांचे मासाहेबांबरोबर लग्न झाल्यावर त्यांनी एक सोन्याची अंबारी करविली. त्या अंबारीत बसून मासा- हेब नागपंचमीच्या दिवशी नागाच्या पुजेला जात असत. CAMERAL LIBMAN सार्वजनिक वाचनालय रोड, (पुणे.) CRED