पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१६] m शिक्षण वगैरे. शिक्षण वगैरे. S लग्न होऊन मासाहेब जरा वयांत आल्यावर त्यांचे सौ- जन्य, सौकुमार्य, सुस्वभाव व विनय पाहून खंडेराव महाराजांचें प्रेम वाढत गेले. महाराजांनी मासाहेबांना शिक्षण देण्याचीही तजवीज ठेविली. माहेरी धुळाक्षर, बाराखड्या, वगैरे शिकल्या होत्या. पुढे काही संस्कृत, व मराठी लिहिणे आणि वाचणे यांचा अभ्यास केला. रुपावली, समाश्चक्र व स्तोत्रे शिकल्या. गणीत, जमाखर्चाची माहिती, मोडी व बालबोध वाचन आणि लेखन, यांत त्या बन्याच प्रवीण झाल्या. मोडीचा पडला कागद त्या घडाघड वाचीत. आलेले कागद वाचून स्वतः उत्तरे लिहीत, अगर कारकुनाकडन लिहवून सही करीत. त्यांनी लिहिलेली काही पत्रे मिळाली. त्यांवरून त्यांचे मोडी अक्षर बरेंच वळणदार होते, असें दिसलें. छापील पोथ्या, पुस्तकें व वर्तमानपत्रे त्या स्वतः अस्खलित वाचीत, किंवा दुसऱ्यांकडून वाचवीत. त्यांना प्राकृत पोथ्या सार्थ कळत होत्या. गायन व कशी- द्याचे कामही त्या शिकल्या होत्या. त्यांचे स्पष्ट वाचन, अक्षर व कशीद्याचे काम, पाहून महाराजांना फार संतोष वाटे. त्यांना घोड्यावरही चांगले बसतां येत होते. राजस्त्रियांना शोभणारे गुण त्यांच्यांत होतेच. शिवाय, गृहिणी या शब्दाचीही सार्थकता यांजकडून झाली होती.