पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१९] काराने बराका बांधविश्या. त्या कामाकडे महाराजांनी दोन लाख रुपये दिले. मुंबईस विक्टोरिया राणीचा पुतळा उभा केला आहे. या कामाकडे त्यांनी एक लक्ष ऐंशी हजार रुपये रोख दिले. सन १८५७ च्या बंडाच्या साली खंडेराव महाराजांनी दोस्त इंग्रजसरकाराला पैशाची व फौजेची उत्तम मदत केली, व राज्यांत कोठेही गडबड होऊ न देतां शांतता राखली. हे उपकार स्मरून सरकाराने त्यांना मोर्चले धरण्याचा अ. धिकार दिला. 'जी. सी. एस्. आय् ' हा मानास्पद किताब दिला. गायकवाडांना तीन लाख रुपये इंग्रजसरकारांत खंडणी द्यावी लागे, ती माफ झाली. गायकवाडांचे घरा- ण्यांत औरस संतती नसल्यास दत्तक घेण्याची सनद तारीख ११ मार्च सन १८६२ साली राणीसरकाराकडून मिळाली. ही सनद मिळाल्यावर पुढे चार वर्षांनी मासाहेबांचे लग्न झाले. बडोदें राज्यांत हिंदधर्माप्रमाणे दानधर्म चाल होताच. शिवाय, खंडेराव महाराजांच्या वेळेस मुसलमानी धर्मालाही विशेष उत्तेजन मिळाले. - खंडेराव महाराजांनी पैमाषखाते सुरू करून राज्याचा वसूल वाढविला. मुंबईहून अमदाबादेकडे बडोदें राज्यांतून आगगाडीचा रस्ता चालू झाला, त्या कामाला लाग- णारी जमीन देऊन साह्य केलें. पोलिसखाते त्यांच्याच वेळेस स्थापन झाले.