पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्यावेळेस त्यांच्या उपयोगी पडली. पुनः अशा रीतीने वाघावर चालून जाण्याचे धाडस करूं नये अशी रेसि- डंटाने त्यांस सल्ला दिली. महाराजांना तालिमबाजीचा शोक फार होता. ते कधी कधी स्वतः मल्लांबरोबर कुस्त्या धरीत. फौजखात्याकडेही त्यांची नजर चांगली होती. त्यांनी काही पायदळ पलटणे व घोड्यांचे रिसाले चांगले तयार लेश ठेविले होते. त्यांचा फेरफटका व कवाइतीचे काम पाहून पागांतील स्वारांस व अम्मलदारांस कधी कधी मंदील, दुपेटे, सोन्याची कडीं, कंठ्या, वगैरे बक्षीस देत. अषाढी एकादशी, अनंतचतुर्दशी व दसरा या दिवशी त्यांच्या स्वाऱ्या मोठ्या थाटाने निघत. ते दिसण्यांत उम्र होते, तरी मनाचे फार कनवाळू होते. त्यांच्या औदार्याची कीर्ति चोहीकडे फांकली होती. ते सत्यप्रिय व निर्व्यसनी होते. ते मद्याला कधी शिवले नाहीत. मद्यपी व लबाड लोक त्यांच्या समोर जाण्याला भीत असत. आपली प्रजा आनंदांत व सुखांत असावी अशी त्यांची नेहेमी इच्छा असे. दुष्काळाच्या वर्षी लाखों रुपयांचा दानधर्म करून त्यांनी लोकांचे प्राण वाचविले. कैक देव- स्थानांकडे त्यांनी लाखो रुपयांच्या नवीन नेमणुका व वर्षा- सर्ने बांधून दिली. सर्व खात्यांच्या कामदारांना त्यांचा मोठा वचक असे. औदार्य, शौर्य, भतदया वगैरे केक चांगळे चांगले गुण त्यांच्या अंगी वसत होते. मकरपुन्याचा वाडा त्यांनी बांधविला. चांदीच्या दोन ताफा त्यांनी ओतविल्या. या अद्यापि दसरा, वगैरेच्या स्वाऱ्यां- पुढे चालवितात. मुंबईस गोया खलाशी लोकांसाठी इंग्रज सर.