पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खंड ५. 55 खंडेराव महाराज. _ खंडेराव महाराजांचे शरीर पिळदार व तेजस्वी होतें. त्यांचे हात लांब व दंड फिरलेले होते. चेहेरा जरा उग्र व कपाळ मोठे होतें. रंग गोरा, डोळे मोठे व दृष्टी तीव्र होती. दाढी व मिशांचे केंस मधून मधून पांढरे होऊ लागले होते. पोशाक साधा करीत. चड्डी वजा सफेत मांडचोळणा, मलमलीचा सदरा व डोकीला दिल्लीशाई सफेत टोपी, किंवा कानटोपी, अशा साध्या व स्वच्छ पोषा- काने ते चौरंगावर बसत. थंडीच्या वेळेस छिटाची दुलई पांघरीत. गादी-लोढाच्या बैठकीवर ते फारसे बसत नव्हते. सणावारी व मोठ्या स्वारीच्या दिवशी मात्र ते गळ्यांत हिरे पांचूचा कंठा घालीत, व भपकेदार जामानिमा करीत. ते कधी हत्तीवर व कधी घोड्यावर बसून वाघ, रानडुकर, वगैरे जनावरांची शिकार करीत. उन्हाच्यावेळेस जंगलांत शिकारीला फिरत तेव्हां ते छत्रीचीही गरज बाळगीत नसत. एकदां ते जंगलांत शिकारीला गेलेअसता त्यांच्या अंगावर एक वाघ चालून आला. तेव्हां घोडा पुढे व वाघ मागें असें झालें. इतक्यांत रस्त्यावर एक मोठे झाड लागले. त्याची फांदी धरून ते चटदिशी उलटी उडीमारून झाडा- च्या खांदीवर जाऊन बसले, ह्मणूनच त्यांचा बचाव झाला. त्यांचे शरीर तालिमबाजीने कसलेलें होतें. ती कसरत