पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१२] साली, वैशाख शुद्ध १२ शुक्रवार, या दिवशी संध्याकाळी गोरज मुहूर्तावर नजरपागेच्या लग्नमंडपांत वधुवरांचे लग्न लागले. लग्न समारंभ १८ दिवस चालू होता. विठ्ठल मंदि- रांत ब्राह्मण भोजने झाली. इतर जातींचीही अन्न संतर्पण झाली. शिष्ट संभावना झाल्या. कैक ब्राह्मणांना, शाल- जोड्या, धोत्रजोडे व शेलापागोटी देऊन सत्कार झाले. अतसबाजी पुष्कळ सुटली. समारंभ मोठा प्रेक्षणीय झाला. या लग्नाप्रीत्यर्थ अजमासें चार लक्ष रुपये खर्च झाला. याप्र. माणे माने पाटील यांची मुलगी महाराणीपद पावली. मा. साहेबांचे सासरचें नांव यमुनाबाई (जमनाबाई) ठेविलें. त्यांच्या दिमतीला कैक दास दासी राहूं लागल्या. मासाहेबांचा वर्ण अगदी गोरापान होता असें म्हणता येणार नाही. डोळे मोठे व पाणीदार होते. कपाळ रुंद व तेजस्वी होते. नाक सरळ व बांधा मध्यम उंच होता. अंगाने सडपातळ होत्या. चेहे-यावर राजतेज असल्यामुळे सुंदर सुंदर स्त्रियांतही त्या ठळक दिसत, स्वभाव शांत होता, तसाच तल्लखही होता. मन फार मोकळे व सदय होते. भाषण चतुर व समजूत उत्तम होती. सारांश, मासाहेबांचे गुण, खंडेराव महाराजांचे प्रेम जडेल असेंच होते. महाराज गादीवर बसून सुमारे १० वर्षे झाली होती, त्यांचे वय त्यासमयीं चाळीशीच्या घराला पोचलें होतें.. आतां खंडेराव महाराजांचा थोडासा वृत्तांत पुढील खंडांत सांगण्यांत येईल. नाना RETE PIEC IPEDIA