पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[११] भावी, कुलीन व हुशार वधु मिळाली तरच पुन्हां लग्न करावयाचे, नाहीतर करावयाचे नाही, असा त्यांचा संकल्प होता. त्यांची मातुश्री चिमणाबाईसाहेब त्यावेळेस हयात होत्या. त्या व भाऊशिंद्यांची मातुश्री, या दोघी बायांचा लग्नाबद्दल त्यांना तगादा लागला. तेव्हां मुलगी सुरेख अस- ल्यास लग्न करतो असें महाराजांनी कबूल केलें. काळे सरदार यांच्या घरी रहिमतपुरकर अप्पासाहेब माने यांची उपवर झालेली सुस्वरूप कन्या आहे असे त्यांना कळले. ती रूपाने चांगली; पण, उफाड्याची नव्हती. वयाने जरा लहान म्हणून ती करावी न करावी अशा विचारांत ते होते; परंतु, शेवटी तिच्याबरोबरच लग्न कर- ण्याचा त्यांचा निश्चय झाला. ___पण, त्या वर्षी लग्नाचे महूर्त नव्हते, सबब पुढील सालच्या वैशाखमासापर्यंत लग्न लांबणीवर टाकावे लागले. लग्नाचा निश्चय झाल्यावर अप्पासाहेब माने रहिमतपुराहून आपली कुटुंबाची माणसे घेऊन बडोद्यास आले. त्यांना राहण्या- साठी सरकारांतून नजरपागेची जागा खाली करून देण्यांत आली. तेथे ते सर्व माणसांना घेऊन राहिले. त्यांच्या खर्चासाठी सरकारांतून दरमहा रुपये ५०० चालू झाले. एक वर्षपर्यंत रहिमतपुरचे पाटील माने यांना लग्न घटकेची वाट पाहात बसावे लागले. .. शेवटी मान्यांच्या आनंदाचा दिवस आला. खंडेराव महाराजांचा हा तिसरा संबंध, सबब चालीप्रमाणे प्रथम अर्क विवाह होऊन नंतर संवत् १९२१ (सन १८६६) च्या