पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१०] खंड ४.. REPRE - S TOES. POPTEलग्न.REDIRST मान्यांच्या घरचा खटला मोठा होता. गुरेढोरे पुष्कळ होती. शेतावर जाणारी गडीमाणसेंही पांच पंचवीस होती. तरी बजूबाईला घरची कित्येक कामें स्वतः करावी लागत, त्या कामी मासाहेबही मातुश्रीला करवेल तितकी मदत करीत. याप्रमाणे त्यांची निरलस व निरभिमान वृत्ति त्यांच्या लहानपणीच दिसू लागली होती. पुढे बजूबाई तान्हीबाईला बरोबर घेऊन आपल्या माहेरी बडोद्यास काळे यांजकडे गेल्या. त्यावेळेस ता- नहीबाईचे वय सरासरी तेरा चौदा वर्षांचे होते. तेथे गेल्यावर काळे सरदार यांजकडून मान्यांच्या मुलीला वर पाहण्याचा उद्योग चालं होता. त्या समयी बडोद्यास खंडेराव महाराज गायकवाड हे विधुर स्थितीत होते. अंबाबाईसाहेब व सावित्रीबाईसाहेब ही त्यांची दोन कुटुंबे होती. अंबाबाईसाहेब शिरक्यांची कन्या, व सावित्रीबाईसाहेब पोवारांच्या घराण्यापैकी होत्या. सावित्रीबाईसाहेब प्रथम वारल्या. नंतर अंबाबाईसाहेब संवत् १९२० (सन १८६५) साली मृत्यू पावल्या. दोषी स्त्रियांच्या पोटी पुत्रसंतान नव्हते. खंडेराव महाराज पुढे वर्ष दीडवर्ष विधुरावस्थेतच होते. दरम्यान मोहिते, कदम, वगैरे आपापल्या मुलीसाठी खटपट करीत होते; पण, त्या मुली त्यांना पसंत पडल्या नाहीत. चांगली सुरेख, सुस्व-