पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[९] 9841 प्रसंग येई, व घोडेही नजरेस पडत. त्यांना हत्ती घो- ड्यावर बसण्याची फार हौस असे. रहिमतपुरास घोडे मिळत; पण, हत्ती बसावयास कोठून मिळणार ? मग त्या आपली हत्तीची हौस अशी पुरवून घेत की,वाड्याच्या मागील चौकांत एक तुळसीवृंदावन आहे. त्याला लागन एक उंच ओंटा आहे. त्याजवर चिरगुटाची घडी टाकून तिची त्या झूल करीत. काळ्या फडक्याची एक सोंड करुन त्याला लावीत, आणि आपण त्याजवर बसून आपल्या माणसांना माहुताचें काम करावयास लावीत. हे त्यांचे गजांत- लक्ष्मीचें भावी चिन्ह आधीच दिसू लागलें. रहिमतपूरगांवीं एक श्रीराधाकृष्णाचे मंदिर आहे. तेथे विष्णूबावा' या नावाचा एक साधु होता. त्याच्या व देवाच्या दर्शनास गांवचे लोक जात असत. मासाहेबांची मातुश्री बजुबाई आपली मुलेबाळे घेऊन कधी कधी देवदर्शनास व त्या साधुपुरुषाच्या भेटीस जात. त्या- वेळेस तान्हीबाईचे वय सरासरी सातआठ वर्षांचे होते. बजूबाई आपल्या मुलांना त्यांच्या पायांवर घालन बोवांशी बोलत बसल्या म्हणजे तान्हीबाईची शांतवृत्ति, आनंदी स्वभाव व मोहक बालभाषण ऐकन ते बजूबाईला म्हणत- ही तुमची मुलगी मोठी भाग्यवान निघेल. ही एकाद्या राजाची राणी हो- ईल.' ही त्यांच्या मुखातून निघालेली वाक्ये पुढे अक्षरशः खरीं ठरली. तान्हीबाई सकाळी मळ्यांत जाऊन तुळशी फुले गोळा करून आणीत, आणि घरी आल्यावर ती परडीत घालून श्रीरा- धाकृष्णाच्या पूजेसाठी विष्णू महाराजांना नेऊन देत असत.