पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ 6] किंवा पीठ, जे हातास लागेल ते, त्याच्या झोळीत त्या टाकीत. भिकाऱ्यांची मुलें उघडी नागडी पाहिली, म्हणजे आपली साडी, चोळी, परकर, जे हाती लागेल ते त्यांस देत. 'भिक्षा थोडी घालावी, घरांतले चिरगुटपांघरूण कोणाला देऊ नये, हात अखडून धर्म करावा' असें घरांतले लोक त्यांना सांगत. ती खोड टाकण्यासाठी कित्येक वेळी त्यांनी आपल्या आईबापांच्या हातचा मारही खाल्ला, तरी त्यांची ती खोड कमी झाली नाही. घरचे लोक रागें भरतात म्हणून त्यांचा डोळा चुकवून चिपटें मापटें धान्य किंवा पीठ, भिक्षे- कऱ्याच्या पदरात टाकून त्याला लागलेंच जा म्हणून खुणेनें सांगत. ही त्यांची भूतदया व देवनिष्ठा शेवटपर्यंत कायम होती. मान्यांच्या वाड्यांत बरोबरीच्या मुली खेळावयाला आल्या म्ह- णजे त्या बाव्हलाबाव्हलींचे खेळ खेळत. त्यांत ह्या राजाची राणी होऊन दुसऱ्या पोरींना आपली कामें करावयास लावीत.आईक- डून भातुकलीचे पदार्थमागून घेऊन आपण भाजीपाला चिरून देत, व मुलींना पाणी भरण्याला व स्वयंपाक करावयास लावीत. मान्यांच्या वाड्यांत एक गांवठी शाळा होती. तेथेच मासाहेब धुळाक्षर व बाराखड्या शिकल्या.मोडी व बालबोध अक्षरांची त्यां- ना थोडथोडी ओळख झाली. त्यांची स्मरणशक्ति तीव्र असल्या- मुळे पंतोजीने काही शिकविलें तरी ते त्या जलद ग्रहण करीत. औंधचे संस्थानीक पंत प्रतिनिधि यांचे हत्ती रहिमत- पुरावरून साताऱ्याकडे कधी कधी जात येत असत. तेव्हां त्यांनी हत्ती पाहिले होते. शिवाय, बडोद्याचे काळे सरदार हे त्यांचे अजोळघर, तेथे आपल्या मातुश्रीबरोबर त्या कधी कधी अजोळी जात, तेव्हां त्यांना हत्तीवर बसण्याचा