पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

BALLIBRARY CENERAT BY KHED सावेजानेक वाचनालय खेड, (पुणे.) खंड ३ /y कुंवारपण. accoxeon. तान्हीबाई, ऊर्फ मासाहेब, यांच्या माहेरच्या गणगोतां. कडून त्यांच्या बात्य दशेतल्या काही गोष्टी कळल्या त्या आता येथे नमूद करितो. मासाहेब आपल्या मातुश्री व बहिणीप्रमाणेच सुस्वरूप होत्या. किंबहुना त्यांच्याहून त्या कांकणभर अधिकच स्वरू- पवान होत्या. त्यांचे शरीर जन्मापासूनच जरा कृश व प्रकृति नाजुक होती. जी माणसें जन्मतः कृश व नाजुक असता- त त्यांची बुद्धि तीव्र व मन निगृही असावयाचे, असा साधारण नियम आहे. त्या नियमास अनुसरून त्यांची चलाखबुद्धि व निग्रहीस्वभाव लहानपणापासूनच दिसू लागला होता. नात्यांचा गोजिरवाणा चेहेरा, बालक्रीडा व बोबडे बेल ऐकून आईबाप व घरांतील सर्व मंडळीला मोठे कौतुक वाटे, त्यांच्या लीला पाहून सर्वांना आनंद होत असे. र मासाहेबांचा औदार्यगण त्यांच्या पाचव्या सहाव्या वर्षां- पासूनच दृष्टीस पडूं लागला होता. कोणाच्याही दाराशीं कोणी भणंगभिकार आले तर त्याला मूठ पसा धान्य किंवा पीठ घालण्याची चाल आहे. त्याप्रमाणे मान्यांच्या घरीही भिकाऱ्यांना भिक्षा घालीत. गोसावी, बैरागी, साधु- संत, लुला, पांगळा, कोणी दाराशी येऊन ओरडू लागला, म्हणजे त्याला पाहून मासाहेबांचे मन द्रवे. मग घरांत धान्य,