पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कामें करीत असत. लिहिण्याच्या कामासाठी पाटलाच्या हाता- खाली कुलकर्णी असतो. अशा व्यवस्थेच्या योगाने पाटील व कुलकर्णी यांच्या कुलांमध्ये कधी की राज्यकार्यधुरंधर, तेजस्वी, सत्ताधारी आणि पराक्रमी पुरुष व स्त्रिया निपजत. इतर जातींमध्येही त्यांच्या त्यांच्या धंद्याप्रमाणे बुद्धि, कला, चातुर्य, इत्यादि गुणांनी युक्त असे कुशल कारागीर निपजत असत. ग्रामसंस्थेच्या नेमणुका वंशपरंपरेनें चालत, यामुळे त्या त्या वर्गामध्ये आनुवंशिक गुण निरनिराळ्या प्रकारचे दिसून येत. -गांवकीचा इतका तपशील एथें देण्याचे कारण हे आहे की, मासाहेबांचा जन्म झाला त्या वेळेस अप्पासाहेब माने यांच्या वाड्यांत पाटीलकीची कामें कशी चालत होती हैं कळावे. त्या जसजशा वाढीस लागल्या तसतशी ती कामें त्यांच्या नजरेत भरूं लागली, अनाथसंरक्षण, दुर्बलरक्षा, अतीतअभ्यागताचा समाचार, ही कामें नित्य वडिलांच्या हातून घडत, ती त्या आपल्या डोळ्यांनी पहात. मोठेपणी त्या थोर पदवीला पोहोचल्यावर तेंच वळण त्यांना लागले. साधनें व संधि मिळाली झणजे कोणाचाही उपज- त अंगस्वभाव दडून राहात नाही. देवब्राह्मणांच्या ठिकाणी भक्ति, औदार्य, चातुर्य, वगैरे त्यांचे अंगचे गुण त्या माहेरी असतांनाच दिसू लागले होते. त्या गुणांचा अंकुर पांचव्या साव्या वर्षापासूनच दिसू लागला. तोच पुढे वाढीस लागला.