पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजाने कामाला माहेरघर. आतां मासाहेबांचा माहेरघरचा लहानपणचा थोडासा वृत्तांत मिळाला तो एथें सांगुन ठेवितों, म्हणजे पूर्वी बाल्य- दशेत घडलेल्या गोष्टींचा संस्कार पुढच्या रहाणीवर कसा घडतो, किंवा स्थित्यंतर व्हावयाचे असले म्हणजे पुढे घडणाऱ्या गोष्टींची चिन्हें पूर्ववयांतच कशी दिसू लाग- तात, हे चांगले लक्षात येईल. मासाहेबांच्या जन्मकाली अप्पासाहेब माने हे रहिमत- पुरचे पाटील होते, पाटीलकीच्या उत्पन्नाशिवाय त्यांचा कणबावा बराच मोठा होता. पाटस्थळ व मोटस्थळ बागाईत जमीन बरीच होती. घरच्या मळ्यांत भाजीपाला व फळ- फळावळही होत असे. रहिमतपुरास मान्यांचा तीनचौकी जुना वाडा आहे. त्यांना अक्कलकोट संस्थानांतून कांहीं रोकड नेमणूक मिळत आहे, असे समजतें. हल्ली गांवच्या पाटलाला पूर्वीच्या इतका अधिकार व प्रतिष्ठा नाही, व पूर्वी इतका कामाचा बोजाही त्याच्या अंगावर पडत नाही. सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी विठोजी माने, रामराव माने व अप्पासाहेब माने पाटीलकी करीत होते त्यावेळी पाटलाचा रुवाब मोठा होता. पाटील म्हणजे गांवचा छोटासा राजा, व गांवचे लोक ही त्याची प्रजा, असा त्यांचा परस्पर संबंध होता. गांवची देखरेख