पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[३] होते. अप्पासाहेबांच्या वेळेस हे माने घराणे मध्यम स्थिती- त होते. मासाहेबांचा बाप अप्पासाहेब हा लष्करी बाण्याचा पुरुष होता. मासाहेबांची मातुश्री बजूबाई ह्या बडोद्याचे सरदार काळे या थोर घराण्यापैकी होया. त्या स्वरूपाने चांगल्या होत्या. बजूबाईच्या पोटी चार अपत्ये झाली, ती येणेप्रमाणे:- १ खाशीबाई. १ आनंदराव, ऊर्फ अण्णासाहेब. सिाहब.ua १ तान्हीबाई. १ गणपतराव ऊर्फ तात्यासाहेब. de 1STEROTICEFHTOT यांपैकी तिसरे अपत्य तान्हीबाई यांचा वृत्तांत या लेखांत दिला आहे. तान्हीबाई हे त्यांचे लहानपणचे माहेरचें नांव. पुढे लंग्न झाल्यावर सासरचें नांव यमुनाबाई असें ठेविलें. गुज- राथी पद्धतीप्रमाणे 'य' चा 'ज' होऊन 'जमनाबाई' असें त्या नांवाचे रूपांतर झाले. नंतर त्या आश्रित जनाला व प्रजाजनाला मातृस्थानापन्न होऊन सर्व लोक त्यांना 'मासाहेब, मासाहेब,' असे म्हणू लागले. मासाहेबांचा जन्म रहिमतपुरास शके १७७५ (इ. स. १८५३) साली श्रा- वण शुद्ध १० रोजी झाला. त्यांची वडील बहीण खाशी- बाई बडोद्याचे हरपळे सरदार यांच्या घराण्यांत दिली आहे.