पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[२] वसविला असावा. छत्रपति शाहू महाराज यांच्या वेळेस रहिमतपुरास चांदीचे नाणे पाडण्याची एक टंकसाळ होती. हा गांव पूर्वी मिरजेचे पटवर्धन सरदार यांचे ताव्यां- त होता. साताग्याच्या पूर्वेस सुमारे ६ कोसावर हा गांव आहे. तेथें आतां रेलवे स्टेशन झाले आहे. या गांवीं माने या अडनावाचे एक मराठ्यांचे प्राचीन घराणे आहे. पूर्वी हे सरदार घराणे विजापूर दरबाराच्या ताब्यात होते. पुढे महाराष्ट्रांत स्वराज्याची स्थापना झा- त्यावर तें सातारकर छत्रपति यांचे अंकित झालें, व त्या गादीच्या मानकरी मंडळांत मोडूं लागले. या माने कुळांतील कित्येक पुरुषांनी विजापूर दरबारा- साठी व पुढे मराठे शाहीतही तरवार चांगली गाजविली होती असें इतिहासावरून दिसून येते. कित्येकांनी आपली राजनिष्ठा, शौर्य व क्षात्रतेज ढळू दिले नाही. पूर्वीपासून हे लष्करी पेशाचे घराणे असल्या- मुळे अस्सल लष्करी तेज त्यांच्या अंगी झळकत होते. त्याच्याच जोरावर त्यांनी रहिमतपूरचें पाटिलकीचे वतन मिळविले. पुढे कालगतीने महाराष्ट्रातील इतर मराठ्यांची घराणी निस्तेज झाली, त्याचप्रमाणे माने घराण्याचीही मूळची तेजस्विता नाहीशी झाली. पूर्वजांनी आपल्या मर्दुमकी- वर पाटिलकीसारखी वतने व जहागिरी मिळविल्या होत्या. मासाहेबांचा पणजा-विठोजी, अजा-रामराव व पिता- विश्वासराव, ऊर्फ अप्पासाहेब, हे रहिमतपुरांत राहून वडि- लोपार्जित पाटिलकीचे वतन खाऊन अब्रूने दिवस काढीत