पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्थिति, प्राणहानि होण्याची रात्रंदिवस भीति, अशा संकटांत दिव- साचे दिवस, महिन्याचे महिने, किंबहुना वर्षांची वर्षे काढणे हे ल- हानसान धैर्याचे व बुद्धिमत्तेचे लक्षण नव्हे. मातोश्री जमनाबाईसाहेब अशा संकटांतूनही पार पडून पुन्हा वैभवास चढल्या. यावरून त्यांचे दृढनिश्चयाचे व बुद्धिवैभवाचे जितकें वर्णन करावें तितके थोडेंच. या कालांत त्यांना दुसऱ्या अनेक लोकांचें सहाय झाले असेल हे खरे आहे. पण उत्तम बुद्धिमान, दूरदर्शी मुत्सद्यास संग्रही राखण्यास तरी माणसांची परीक्षा लागते, व स्वतःचे अंगी तसले गुण असल्या- शिवाय चांगली माणसेंही संग्रही रहात नाहीत. श्री. छत्रपति शिवाजी महाराजांचे अंगी अलौकिक गुण होते याबद्दल कोणासही शंका नाही. यांचे संग्रहीं जी जी माणसें होती तीही सर्व तशाच गुणांनी परि- पूरित होती. तेच संभाजी महाराज राज्यावर बसल्या बरोबर त्या माणसांस देशोधडी जाण्याची पाळी येऊन हलक्या माणसांचा संग्रह झाला. त्याचा परिणामही सुप्रसिद्धच आहे. तसेच पुढें शाडू महाराजांचे कारकिर्दीत पुन्हा मुत्सद्दी व शूर लोकांचे हाती राज्य- सत्रे आली. तातर्य, सलाकारांचे उत्तम मसलतीने मासाहेब संकट- कालांतून पार पडल्या ही गोष्ट मान्य केली, तथापि तसले उत्तम लोक संग्रही राखण्याइतके शहाणपण, मानसिक स्थिरता, वर्तता, निश्चय वगैरे सासाहेबांच्या आंगी होती ही लहानसहान गोष्ट आहे असें नाही. गुणी लोक संग्रही राहण्यास यजमानही गुणीच ला- गतो. असो. या कालांत ज्या ज्या मनुष्यांचा उपयोग मासाहेबास झाला असें चरित्रकारांनी लिहिले आहे त्यांत एका ठळक पुरुषाचा. नामनिर्देश झालेला दिसत नाही. हा पुरुष आण्णासाहेब किये हा होय. मासाहेशंच्या आयुष्यांतील तिसरा भाग.-पुन्हा राज्यप्राप्ती. आ- पत्तीकाल काढणे जितके कठीण आहे, त्यापेक्षाही वैभवकालांत, मनाची समता राखून खैरवर्तनावर अंकुश राखणे आणि तारुण्य, सत्ता, संपत्ती इत्यादिंचा मद चढू न देतां अहंपणाचा त्याग करून, सर्व क्रिया योग्य रितीने करणे फार कठीण आहे; आणि असले प्राणी फारच विरळा सांपडतात. या कालांत श्री. महाराणीसाहे-