पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बांच्या आंगचे सौजन्य, आप्तवर्गाविषयीं, प्रेम, भूतदया, गुणिजनांच सत्कार, राज्य कारभारांत योग्य सल्लामसलत व मदत करण्याची शैली, श्रीमंत महाराज साहेब यांचे शिक्षणाविषयी दक्षता वगैरे गुणांचा विकास झाला. एकंदर देशकाल स्थितीमुळे या गुणांचा पूर्ण विकास होण्यास अवकाश नव्हता त्यामुळे महाराणी जमनाबाई साहेब यांचें नांव अधिक चिरस्थाई होण्यास मार्गच नव्हता त्यास उयाय नाही. जर तसा अवकाश मिळता तर या राजस्त्रीच्या आं- गचे लोकोत्तर गुण सर्वतोमुखी स्तुतीचा एक विषयच होऊन बसले असते यांत संशय नाही. चवथा व शेवटला भाग पुनः संकटकाल.-या कालांत मासाहे. बांची एकुलतीएक परमप्रिय कन्या वारली. त्यांची स्वतःची शरीर प्रकृती क्षीण झाली. तसेंच दुसऱ्या काही कारणांनी त्यांची वृत्ति उदास होत चालली; आणि उत्तरोत्तर त्यांचे लक्ष पारलौकिक साधनाकडे वळत चालले. या कालांतही तसल्या स्थितीस अनु- रूप असाच वर्तनक्रम त्यांचे हातून झाला. तीर्थयात्रा, देवालये बांधणे, पूजाअर्चा, देवसेवा, अन्नसंत्तर्पण, भूतदया, दानधर्म वगैरे कृत्ये याकाली मासाहेबांच्या हातन पुष्कळ झाली त्यांचे वर्णन चरित्रकारांनी थोडक्यांत फार चटकदार केलेले आहे; व ही सर्व बडोद्यांतील लोकांच्या डोळ्यांपुढे मार्तिमंत अयापि उभी आहेत. शेवर्टी इतकेंच म्हणणे बस आहे की चरित्रकारांनी मासाहेयांचा जो गुणानुवाद गाईला आहे त्यांत किंचितही अतिशयोक्तीचा भाग नाही इतकेच नव्हे तर जेवढें वर्णन त्यांनी केले आहे त्यापेक्षां फार- च अधिक स्तुतीस मासाहेब पात्र होत्या यांत संशय नाही. अशा उत्तम राजस्त्रीचे चरित्र रा. सा. नागेशराव यांनी थोडक्यांत उत्तम रीतीनं लिहिले यामुळे त्यांचे मराठी वाचकांवर फार उपकार झाले आहेत असें झटले पाहिजे. बडोदें. ता.१०-१२-१९००. विठल लक्ष्मण कवठेकर.