पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांगणे हे खऱ्या वाटाड्याचे काम नव्हे असे कितीएकांचे मत आहे. आपण लिहिलेल्या चरित्रावर सदरहु आक्षेप उत्पन्न होण्यास जागा आहे ही गोष्ट चरित्र लेखकांच्या लक्षांतून गेली आहे असे नाही. त्यांनी हा आक्षेप चरित्राचे शेवटी पान १३० मध्ये नमूद करून त्याचा जबाबही दिला आहे त्याअर्थी त्याविषयी येथे पुन्हा वाद उत्पन्न करण्यांत कांहीं हशील नाही. आतां चरित्रनायिकेच्या अंगी चरित्रलेखकांनी जे जे गुण अस- ल्याचे वर्णन केले आहे ते किती अंशाने यथार्थ आहे येवढेच पाह- ण्याचे राहते. या घटीने पाहतां चरित्रलेखकांनी आपले काम फा- रच सुंदर रीतीने उत्तम प्रकारे बजाविले आहे यांत संशय नाही. महाराणी जमनाबाईसाहेब यांचे अंगचे थोर व अलौकिक गुणां- विषयीं मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, बडोद्यांतील गव्हरनर जनरलचे एजंट सर रिचर्ड मीड व मेलदील, तसेच राजकार्यधुरंधर राजे सर टी. माधवराव बडोद्याचे दिवाण यांच्यासारख्या थोर पुरु- षांनी अनेकवेळा आपले विचार नमुद करून ठेवले आहेत, त्यापेक्षा विशेष मजबूत पुरावा शोधण्याची काही जरूर आहे असे दिसत नाही. श्री. माहाराणी जमनाबाईसाहेब यांचे आयुष्यक्रमापैकी बाल्यापण वजा केले असतां बाकी कालाचे चार मुख्य भाग आहेत. पहिला भाग लग्नापासून श्री. खंडेराव महाराजांचा काल होईपर्यंत. या भागावि- षयी चरित्रकारांनी काही लिहिलेले दिसत नाही. दुसरा भाग संकटकाल. हा खंडेराव माहाराजांचे मृत्युपासून श्री. जयनाबाईलाइव पुन्हा बडोद्यास येईपर्यंतचा. प्रथम लहानपण असन पुढे ऐश्वर्य प्राप्त होणे ही ईश्वरी कृपा आहे, पण मनुष्यास प्रथम ऐ- श्वर्य असून पुढे संकटकाल येणें हैं पूर्व पापाचे फाल होय. अशा वेळी मनुष्याचे मनाची कशी स्थिति होते ती नुसत्या कल्पनेने समजणे कठीण आहे. अनुभवाशिवाय या स्थितीचे खरे ज्ञान होणे अशक्य आहे. स्त्रीजाति, अल्पवय, राज्यवैभव भोगलेलें, गरोदर