पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श. ब. विठ्ठल लक्ष्मण कवठेकर बी. ए. बडोदें राज्यांतील नायबसुभे यांचा अभिप्राय. श्री. महाराणी जमनाबाईसाहेब यांचे चरित्रः-हा लहानसा ग्रंथ रा. सा. नागेशराव बापट यांनी लिहिलेला आहे. पावसाहेब नागेशराव यांचा मराठी वाचकांशी पुष्कळ परिचय आहे, यणन त्यांच्या हल्लीच्या लहानशा कृतीतील भाषासौदर्य, सुंदर व चटकदार वर्णनें वगैरेबद्दल फारसे वर्णन करण्याची जरूर नाही. थोर पुरुषांची चरित्रे कशा पद्धतीने लिहिलेली असावी व ती तशी कां असावी अशाबद्दल नियमन करणे हे सर्वांस प्राय होणार नाही. मनुष्यमात्रांत जसे गुण असतात तसेच अवगुणही असतात. चरित्रलेखनाचे मुख्य दोन हेतु असतात. एक चरित्रनायकाचे जन्म- वृत्त लिहून ठेवल्याने त्याचे स्मरण चिरस्थाई होते, व दुसर थोर पुरुषांच्या कृतीचा कित्ता पुढच्या पिढीच्या सोळ्यासमोर ठेवल्याने अनुकरण करण्यास उदाहरण मिळून मनावर उत्तम संस्कार होतात. पहिल्या हेतूविषयी येथे फारसे लिहिण्याची जरूर नाही. दुसरा हेत प्रस्तूतचे चरित्रांत किती साध्य झाला आहे हे पहाणे राहते. थोर पुरुषांचे गुणवर्णन केल्यापासून जसा फायदा माहे तसेच त्यांचे अंगी जे दोष असतील, अगर त्यांचे हातून ज्या चुका अथवा म माद घडले असतलि त्यांचेही दिग्दर्शन होणे अत्यंत जरूरीचे आहे. अपरिचित प्रदेशांत प्रवास करणे असेल तर मार्गात उतरण्याच्या उत्तम सोई कोठे कशा आहेत. रस्त्यांत पाणी, वाहन, नेहमी लागणारे सामानसुमान वगैरे कोठे कसे मिळते हे सांगण्याची जशी जरूर आहे. तशीच कोठे वाट अवघड आहे, चोरांची भीति कोठे आहे, भयंकर अरण्य अथवा र पशंचा उपदव कोठे होण्याचा संभव आहे, ती टाळण्यास कसे वागले पाहिजे वगैरे हकीकतही समजण्याची जरूर राहते. एकच भागाचे वर्णन करून दुसऱ्या भागाबद्दल काहीच न