पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शनाचे काम केलें आहे व महाराणी साहेबांची तसबीरही दिली आहे, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. वरील माझी सर्व अपत्ये (पुस्तक) विद्यादेवीच्या मंदिरांत मराठी भाषेच्या अभिवृद्धिसाठी यथामति व यथाशक्ति उद्योग करण्यांत गुंतली आहेत. विश्वविद्यालयांत मराठी भाषेचा प्रवेश होण्यासाठी सर्वांबरोबर तीहि झटत आहेत. ज्या दिवशीं तो प्रयत्न फलद्रूप होईल तो सुदीन, असो. हे अठ्ठाविस खंडांचे मासाहेबांचे चरित्र लिहून त्यांचे सन्मान्य पुत्र श्रीमंत सयाजीराव महाराजसाहेब यांचे सेवेशी रुजू केलें आहे. वर दर्शविलेल्या ग्रंथांपैकी नंबर २ व ८ हे दोन ग्रंथ श्रीमंतांच्या पूर्ण कृपेस पात्र झाले आहेत. त्याच कृपादृष्टीचा ओघ या मातुश्री साहेबांच्या चरित्राकडेही वळेल अशी भरपूर उमेद आहे. बडोदें, तारीख ३०॥ भव्हेंबर सन १९... . चरित्रकार,