पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

amannam ना न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे, यांचा अभिप्राय. 'श्रीमंत महाराणी जमनाबाई साहेब यांचे चरित्र' या नांवाचे पुस्तक रा. सा. नागेशराव बापट यांनी इकडे अभिप्रायाकरिता पाठविलें, ते समग्र वाचून पाहिले, एकंदर खंडे २८ आहेत. खंड ६ यांत त्यांच्या शिक्षणाची जी माहिती दिली आहे, त्यावरून राज- स्त्रियांना योग्य असेंच शिक्षण त्यांना मिळाले होते, व हेच त्यांना नावारूपास येण्यास कारण झाले असे दिसते. शिवाय 'गहिणी' या नांवाला शोभविणारे त्यांचे वर्तन होते. इतकेच नाही, तर धर्म- संबंधी बाबतीतही त्या फार पुढे होत्या. त्या भक्तिमान, श्रद्धालु व बहुश्रुत होत्या, असा पुष्कळांचा अनुभव आहे. त्याप्रमाणेच त्यांनी केलेल्या दानधर्माची माहिती सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्यांनी खरें संसार- सुख फार थोडे दिवस भोगिलें, व पुढें संकटाचे दिवस आले तरी न डगमगतां धैर्यानें व मुत्सद्दिपणाने त्यांतूनही मार्ग काढून पुढे मि- ळणाऱ्या स्वातंत्र्यसुखाचा उपभोग घेण्यास त्या टिकाव धरून रा- हिल्या. तसेच पुढे दत्तविधान झाल्यानंतर महाराज सयाजीराव व ताराबाई यांनां शिक्षण देण्याचे कामी जी काळजी घेतली, तिच्या योगानेच महाराजांच्या मनावर चांगला संस्कार होउन उभयतां मातापुत्रांना सुखावह व भूषणावह झाले. याप्रमाणेच उभयतां बहीणभावंडांचा विवाह, प्रीन्स आफ् बेल्स यांची भेट, त्यांचे वडोद्यास आगमन, त्यावेळी राणीसाहेबांनी ठेविलेला बंदोबस्त प्रशंसनीय होता. एकंदरीत पुस्तक सर्वांनी अवश्य वाचण्यासारिखें झाले आहे. रा. सा. बापटांचे नेहमीचे पद्धतीप्रमाणे भाषा शुद्ध, सरळ, प्रौढ व सुबोध असून गोड आहे. पुस्तक सर्वांनी त्यांत विशेषेकरून स्त्रियांनी वाचावे असा इकडील अभिप्राय आहे. खंबालाहिल, पेडर रोड, महादेव गोविंद रानडे. मुंबई, ता. १६-११-१९००.