पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Com प्रस्तावना. 'न पतति पिता यस्मात तत् अपत्यं' ह्मणजे ज्याच्यापासून पित्याचे पतन होत नाही तें, अशी अपत्य या शब्दाची मूळ उप- पत्ति आहे. तिला अनुसरून पुस्तकालाही जर अपत्य ह्मणतां येईल तर यापूर्वी, १ पहिले बाजीराव साहेब पेशवे, २ दादोजी कोंडदेव, ३ सुरस वाक्यरत्नावली, ४ संभाजी महाराज, ५ सुभद्राहरण, टिटवी, ७लिकॅलेअर चरित्र, ८ पानपतची मोहिम, ९ चितूर गडचावेढा अशी नउ अपत्ये झाली, आणि प्रस्तुतचें चरित्र हे माझे दहावे अपत्य होय. पहिल्या लहान मोठ्या नऊ अपत्यांची हकिकत त्या त्या पुस्त- काच्या प्रस्तावनेत येउन चुकलीच आहे. हे दाहावें पुस्तक, बडोदें राज्याचे इंग्रजी वार्षिक रिपोर्ट, सन १८७५ पासून १८८१ पर्यंतचे History of the Imperial Assemblage at Delhi 1877; His Royal Highness Prince of Wales' tour in India by Mr. Russell; Indian Maga- zine and Review No. 338; Rulers of Baroda by Mr. Elliot पावगीकृत भारतीय साम्राज्य; माने घराण्या- कडून मिळालेले काही कागदपत्र व माहिती; आणि बडोदे येथील कांहीं गृहस्थांकडून मिळालेली तोंडी माहिती, इ. साधनांच्या आधारें तयार केले आहे. रा. रा. दत्तात्रय बळवंत पारसनिसानी प्रकाशकांच्या विनंतीवरून या चरित्राचा उपोद्घात लिहिला आहे. कार्लाइलच्या ह्मणण्याप्रमाणेच हे शुद्ध चरित्र असून यांत कल्पनेचाभाग मुळींच नाहीं, सबब पारसनिसांचा उद्गार या चरित्राच्या संबंधापुरता तरी अप्रासंगिक आहे. ही गोष्ट पुढे त्यांच्याही नजरेस येऊन चुकली आहे. पुस्तक समग्र वाचून पाहून विद्वन्मुगुटमणी ना. न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे व रावबहादुर विठ्ठल लक्ष्मण कवठेकर; बडोदें राज्यांतील वाकबगार नायबसुभे यांनी आपले अभिप्राय दिले आहेत, आणि बडोद्याचे ग्रंथसंपादक व प्रकाशक मंडळीनी ग्रंथाच्या प्रका-