पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर टी. माधवराव ह्यांचे उद्गार. पत्नी मृतराजाची, यशस्विनी धर्मचारिणी मानी। राणी यमुनाबाई, स्त्रीमणि हे सर्व मंडळी मानी ॥१॥ दुःखविवर्जित राज्ञी, आली इकडे सवेग त्या उपरी । त्या शुभसमयीं नगरी, शोभतसे राहुमुक्तचंद्रपरी ।। २ ।। कृत्रिम पूर्णसमुद्री, सत्पथ करण्यास राज्यनौकेला। मान्य प्रधान माधव, सहाय घेअनि यत्नही केला ॥३॥ या गायकवाडीची, कितिएक सुधारणा बरी झाली । परिमार्जित राष्ट्राला, आली शोभा नवीच त्याकालीं ॥४॥ अर्धद्वादशवर्षे, भाग्य समाधान सौख्य यांसहित । सरळचि सरली समजा, सदय मने साधिले जनांस हित ।।५।। सप्रेम पोषणाने, युवराजा शीघ्र जाहला तरुण । नृप दिसतो लोकांला, तो प्रातःकाळचा जसा अरुण ॥ ६ ॥ बहु मान पावला तो, भेटुनि व्हिक्टोरिया कुमाराला । निज राज्यदर्शनाने, हर्षविला त्या महानुभावाला ।। ७ ।। काशी प्रयाग दिल्ली, मथुरा वृंदावनादि यात्राही । करुनि सुरक्षित आला, घेउनि पूज्य प्रसिद्ध मुद्राही ।। ८ ।। कावेरी नदितीरी, शिवबंधूच्या गृहीं वधू होती। प्रतिनिधि तिजला निवडी, अगाध रत्नाकरी जसे मोती ।।९।। त्या प्रांतापासुनि ती, लक्ष्मी आणूनि यास वर केला । रतिमदनतुल्य वधूवर, पाहुनि अत्यंत हर्ष यमुनेला ॥१०॥ सुंदरि सुकुमारि सुता, तारा लग्नास योग्य ही झाली । सांवतवाडी राजा, तिजला वरिला सहर्ष त्या काली ॥११॥