पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तैशा त्या विषम प्रसर्गि तुजला देवें दिली तारका । बाटे त्या व्यसनार्णवांत बुडतां होती तरी तारका ।। आहे पोक्त हुशार सूज्ञ बहु ती बालत्व आहे जरी। जातींचे परि हो पुती ह्मणति ते ती गोष्ट आहे खरी ॥९॥ येई भाग्य यदा तुला सुत मिळे तो साजिरा गोजिरा। प्रतिी त्यावरती तुझी दृढ बसे आहे नृपाली हिरा ॥ स्याचे प्रेम तुझ्या पदी दृढ तसे त्या जन्मदेच्या नसे । वत्सा दुग्ध न गोचिडीस जरि ती थानावरीहि बसे ॥१०॥ राणी व्हिक्टुरिया हिने निज सखी मानोनियां गौरवें। होई केसर-हिंद ते तुज दिला तो चांद तारखें ।। वाटे चांदमिर्षे तुझ्यावरि करी पुष्पांचियें वर्षण। धन्यत्वा तव राज्ञि ! मानित असे देवर्षि यांचा गण ॥ ११ ॥ तारा कन्या पुत्र राजा सयाजी। यांच्या योगें धन्य तूं धन्य आजी॥ दोघां केलें शाहणे, त्वत्प्रसाद । शब्दा ऐसा होतसे नित्य साद ॥ १२ ॥ तुला सून ती शाहणीशी मिळाली। पयामाजि की शर्करा ही मिळाली ॥ करो सोख्य आनंद हे दंपती तें। शचीच्यासवें इंद्र भोगी तसे ते ।।१३।। चिरकाल नांद राज्ञी ! सौख्यामाजी निमग्न होऊन । इच्छित वर तो देवो ईशकृपें किमपिही न हो उन ॥ १४ ।। ENE सार्वजनिक याजनालय सखेड, (पुणे.) SONAL