पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. तैशी तूं वटपद्रि थोर यमुना सर्वो तुझा आसरा। नांदे सुष्ट तसाचि दुष्ट पदरी, तू सत्कृपेचा झरा ॥२॥ येई भाग्य जनांस तैं धनमदें गर्वाध होतात ते । बोटें दोन तयांस स्वर्ग उरतो खाली न त्या दीसते ॥ कोटी लोक तुझ्या असोनि पदरी वृत्ती तुझी सात्विक । सर्वांचे वरि फार लोभ करिशी, स्त्री-जातिचे माणिक ॥ ३॥ मुकुटमणि की धीराचा तो पती. तब सुंदर। कपट ह्मणुनी ठावें ज्यातें नर्स धरणीवर ।। जार्य हरपला खंडेराया गुणाकर साजिरा। त्रिभवनिचिया गेला गेला गमे सकळां हिरा ॥ ४ ॥ दिवस खष्ट तदा तुज लागला। बहुत काळ तुला बघ भोवला ॥ प्रबळ सो विधिलेख कुणासही । न सुटतो करितो आपुली सही ॥५॥ जैसा तो पौर्णिमेचा विलसत असतां चंद्र त्या घेरिताती। दुप्टे अभ्रे जवाने मिळुनि अवचिती त्यास आच्छादिताती ।। तेव्हां कासारिं पने गतरुचि दिसती शीघ्र कोमेजताती । तेजोहीनप्रभा तैं अवनितल दिने होय उद्विम वत्ति ।।६।। तैसें त्वद्भाग्य-चंद्रा, मळकट बहुसे मेघ आच्छादिती ते। तेव्हां तं पुण्यभमी धरिशिच, अयनें आठही स्वस्थ चित्तें ।। वाहे नार्थब्रुकाख्य प्रबल पचन तें मंदही कार्यकारी। सोडोनी सर्व गर्वा, दशदिशि दडती मेघ ते दुष्ट भारी ॥७॥ झालें बरें दुःखचि पूर्व आलें।" की दुःखसौख्यात्मक चक्र चाले ॥ पाने गळोनी शिशिरी वनांची । ये पालवी चौत्रं मनोज्ञ साची ॥८॥