पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९ कथानकाच्या सुंदर पटावर कल्पनेच्या हृदयाल्हादक रंगांत खुलवि- लेली असते, हेही महाराष्ट्रवाचकवृंदास पूर्णपरिचित झालेले आहे. तेव्हां त्याबद्दल अनुकूल अथवा प्रतिकूल टीका करण्याची विशेष आवश्यकता राहिलेली नाही. सहृदय व मार्मिक वाचक वास्तविक गुणांचा रसास्वाद घेण्यास पूर्ण समर्थ आहेत. असो. शेवटी, महाराष्ट्रस्त्रियांच्या चरित्रमाहात्म्यासंबंधानें व पर्यायेंकरून महाराणी जमनाबाई साहेब ह्यांच्या चरित्रासंबंधाने दोन शब्द लिहा- वेत, अशी प्रकाशकांनी आग्रहपूर्वक इच्छा दर्शविल्यावरून वरील दोन शब्द लिहिले आहेत. त्यांचा रसिक वाचक कृपाकरून स्वीकार करतील अशी उमेद बाळगून हा लेख पुरा करितो." दत्तात्रय बळवंत पारसनीस. पा कै. श्रीमंत जमनाबाईसाहेब ह्यांच्या चरित्रासंबंधानें प्रस्तुत लेखकास विशेष माहिती असण्याचा संभव नसल्यामुळे त्यास बडो- द्याचे दिवाण सर टी. माधवराव व कांहीं इंग्रज लेखकांचे लेख ह्यांवर सर्वस्वी हवाला ठेवणे भाग पडले आहे. त्यांच्या आधारें जमनाबाईसा- हेबांच्या चरित्रासंबंधाने जे विचार सुचले ते वर दिले आहेत. ह्याच विचारांची छाया एका प्रख्यात महाराष्ट्रभाषापंडिताने सुमारे २० वर्षापूर्वी लिहिलेल्या काव्यांतही दिसून येते. ते काव्य जरी स्फुट आहे, तरी जमनाबाईसाहेब हयात असतांना लिहिले असल्यामुळे, ते येथे सादर केल्यावांचून राहवत नाही. ते येणेप्रमाणे:-- श्लोक.. जेथें प्रेम गमे उदंड अथवा पूज्यत्व वाटे जिथे। होई ती लडिवाळ वात्त बहुधा ही लोकरीती-तिथें ।। मातेते परमेश्वराहि वचनें एकेरि संबोधिती । नाही राग तया, तसां तुज नसो, व्हावी कृपा ये रिती ॥ १॥ सूर्याची तनया प्रसिद्ध यमुना नांदे दिशी उत्तरीं। योगी वीर सुबुद्ध हीन सकळां मानी समा अंतरी ।।