पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ राणी जमनाबाई साहेब ह्यांस ते किती आनंदावह व भूषणास्पद झाले, हे शब्दांनी व्यक्त करण्याची आतां आवश्यकता राहिली नाही.' असो. बडोद्यासारख्या महाराष्ट्रसंस्थानांतील एका राजस्त्रीच्या सुशिक्षणानें, हिंदुस्थानास ललामभूत होणारा असा एक नृपति निर्माण झाला, ह्यावरून स्त्रियांच्या मनावर सुशिक्षणाचे महत्त्व पूर्णपणे बिंबले तर केवढे अलौकिक कार्य होते. हे चांगले मनन करण्यासारखे आहे, व त्यावरून अनेक प्रकारचा बोध घेण्यासारखा आहे. ह्या दृष्टीने पा- हिले असतां, अगदी अलीकडच्या काळांतही होऊन गेलेल्या ह्या महाराष्ट्रस्त्रीचें चारेत्र वाचकरंदात आदरणीय वाटेल. अशी उमेद बाळगण्यास हरकत नाही. प्रस्तुत चरित्रग्रंथ महाराष्ट्र भाषेतील सुप्रसिद्ध ग्रंथकार रा. सा. नागेशराव विनायक बापट ह्यांनी लिहिला असून तो बडोदे येथील 'ग्रंथसंपादक व प्रसारक मंडळीचे व्यवस्थापक रा. रा. दामो- दर सांवळाराम ह्यांनी प्रकाशित केला आहे. ह्या ग्रंथाच्या अंत- बाह्य सौंदर्याबद्दल वाचकांस विशेष काही सांगणे जरूर आहे असे वाटत नाही. ग्रंथकार रा. सा. बापट ह्यांचे अनेक चरित्रग्रंथ महाराष्ट्र वाचकांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे त्यांच्या सुंदर व गोड भाषास- रणीबद्दल सर्वांची खात्री झालेलीच आहे. तेव्हा त्याबद्दल पुनः नवी शिफारस करणे अगदी अप्रयोजक होईल. रा.सा नागेशराव विनायक बापट ह्यांची ऐतिहासिक चरित्ररचना, कार्लाइल ह्या इंग्रजी ग्रंथकाराने हटल्याप्रमाणे, - Biography is the only true history"ह्मणजे " चरित्र हा फक्त खरा इतिहास होय " ह्या सशास्त्र व शुद्ध नियमाने सर्वस्वी बद्ध झालेली नसून, ती ऐतिहासिक in, under God's blessing, make acquisitions infini. tely more precious than the gems shining resplen. dent on his breast-that he will realise the ideal of a wise and variuous ruler of a regenerated Kingdom." -Sir T. Madhavrao.