पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राणी जमनाबाईसाहेब ह्यांच्या यशाचा स्वतंत्र भाग किती होता हे ठरविण्यास काही मार्ग नाही. परंतु सर टी. माधवराव व सर रिचर्ड मीड ह्यांनी ज्या अर्थी महाराणी जमनाबाईसाहेब ह्यांचे राज्यव्यव स्थत उत्कृष्ट साहाय्य झाल्याबद्दल स्ततिवाद गाइले आहेत. त्याअर्थी बडोद्याच्या राजकारणांत जमनाबाईसाहेबांचे बरेंच चातुर्य प्रकट झाले असावे, असे मानण्यास हरकत नाही. महाराणी जमनाबाई साहेब ह्यांच्या हाती स्वतंत्र राज्यकारभार नसल्यामुळे व सर टी. माधवराव व सर रिचर्ड मीड ह्यांच्यासारखें राजव्यवहारदक्ष, चतुर व सर्वसूत्रचालक असे मंत्री राज्यकारभार व्यवस्थित रीतीने चालवीत असल्यामळे. त्यांच्या राजकीय गणांचे खरें तेज पूर्णपणे प्रदीत होण्यास अवकाश नव्हता, असें झटले तरी चालण्यासारखे आहे. . परंतु ह्या राज्यक्रांतीत त्यांना 'राजमाता' ह्मणून जो अधिकार प्राप्त झाला होता, तो त्यांनी कशा रीतीने बजावला हे पाहणें विशेष अगत्याचे आहे. महाराणी जमनाबाई साहेब ह्यांनी जर काही विशेष अभिनंदनीय. विशेष अनुकरणीय व विशेष स्मरणी- य अशी गोष्ट केली असेल, तर ती त्यांनी 'राजमाते'चे कर्तव्य उत्तम रीतीने बजाविलें हीच होय. ह्याबद्दल त्यांचे नांव बडोद्याच्या इति- हासांत सवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे ह्यांत शंका नाही. हैं राजमाते'चे कर्तव्य ह्मणजे श्रीमंत महाराज सयाजीराव ह्यांचे सुशिक्षण हे होय. सर टी. माधवराव किंवा सर रिचर्ड मीड ह्यांनी महाराजांच्या शिक्षणाबद्दल कितीही काळजी घेतली असली, तरी त्याचें बहुतेक-किंवा सर्व-श्रेय महाराणी जमनाचाई साहेब ह्यांसच दिले पाहिजे. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज ह्यांच्या शिक्षणाब- बल इतकी काळजी घेतली की, त्याबद्दल त्यांची स्तति करावी ति- नकी थोडी आहे. श्रीमंत महाराज सयाजीराव यत्किचित् देखील स्पर्श होउं न देण्याबद्दल व त्यांस सद्गुणसंपन्न व मशिक्षित करण्याबद्दल जे काही प्रयत्न झाले आहेत, ते सर्व फलद्रूप टोण्यास, 'राजमाता' महाराणी जमनाबाई साहेब ह्यांचंच साहाय्य मख्यत्वेकरून कारण झाले, असे आम्हीच ह्मणतो असे नव्हे, त्या-