पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ ह्या एकाच उदाहरणावरून अद्यापिही महाराष्ट्रराजघराण्यातील स्त्रि- यांमध्ये नांवलौकिक प्राप्त करून घेण्यासारखें विशेष गुण उत्पन्न हो- तात किंवा दृष्टोत्पत्तीस येतात, असें मानिले तरी चालण्यासारखे आहे. अर्थात् अशा स्त्रियांची ही चरित्र प्रसिद्ध करून त्यांच्या गुणांचे पोवाडे गाइले असतां, चालू पिढीवर स्त्रीजातीच्या योग्यतेविषयी व त्यांच्या शिक्षणाविषयीं अल्पसा तरी अनुकूल संस्कार होण्याचा संभव आहे. असाच उद्देश मनांत आणून प्रस्तुत चरित्रग्रंथ महाराष्ट्र भाषेतील प्रख्यात ग्रंथकार रा. सा. नागेशराव विनायक बापट ह्यांनी लिहि- ण्याचे योजिलें असावें. महाराणी जमनाबाईसाहेब ह्यांच्या नैसर्गिक बुद्धिवर्चस्वाची किंवा राजकारणपटुत्वाची दिगंत कीर्ति होण्यासारखे प्रसंग देशकालवर्त- मानाप्रमाणे येण्याचा संभवच नसल्यामुळे, त्यांना अहिल्याबाईच्या किंवा सुजानबाईच्या वर्गात गणतां यावयाचे नाही. तथापि मल्हार- राव महाराजांच्या कारकीर्दीत जी अव्यवस्था झाली, व तदनंतर बडोदें संस्थानांत जी राज्यक्रांति झाली, त्याप्रसंगी जमनाबाई साहे- बांनी फार चांगले वर्तन केले हे सर्वश्रुतच आहे. ह्यावेळी ब्रिटिश सरकारानेही जमनाबाईसाहेबांचा योग्य मान ठेवून त्यांना विशेष महत्त्व दिलें व बडोदें संस्थानास कल्याणप्रद अशाच गोष्टी केल्या हे प्रांजलपणे कबूल करणे भाग आहे. ह्यावेळी हिंदुस्थानचे गव्हर- नर जनरल लॉर्ड नार्थब्रूक साहेब हे होते. ह्यांनी त्रावणकोर व इंदूर येथील राज्यव्यवस्थेत अत्त्युत्तम सुधारणा करून प्रसिद्धीस आलेले मत्सद्दी राजे सर टी. माधवराव ह्यांची बडोदें संस्थानच्या दिवाणांग- रीवर योजना केली; आणि महाराणी जमनाबाईसाहेब ह्यांच्या पसंतीने सध्यांचे महाराज श्रीमंत सयाजीराव ह्यांस बडोदें संस्थानचे आधि- पति करून, संस्थानचा राज्यकारभार उत्तम रीतीने चालेल अशी तजबीज केली. ह्यावेळी बडोद्याचे रेसिडेंट सर रिचर्ड मीड हे होते. हेही मध्यहिंदुस्थानांतील बहुविध संस्थानांत अनेक वर्षे राजकारणे खेळविल्यामुळे चांगले अनुभवी बनले होते. ह्या तिघांनी मिळून बडोदें संस्थानची फार चांगली सुधारणा केली. ह्या सुधारणेत महा-