पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ कांतीप्रमाणे लोकांच्या नजरेस आले नाही, तर त्यांत आश्चर्य ते काय ? तात्पर्य, गुणांचे प्रकटीकरण होण्यास अवश्यक जे प्रसंग ते नसल्या- मुळे, ते व्हावे तसे होत नाही. त्यामळे निसर्गतःच उत्पन्न झालेले स- गुणांचे अंकुर जागच्याजाएँच करपून जाउन निष्फळ होतात. यदा- कदाचित् त्यांतील एखादी सद्गुणवेली जोमदार होउन ती वाढू लागली, तर आसमंतात्च्या कांटेरी झाडांत गुरफटून जाण्याची भीति असते. तात्पर्य, महाराष्ट्रसंस्थानांतील अथवा राजघराण्यातील स्त्रिया गुणसं- पन्न व कीर्तिसंपन्न निपजण्याची आशा दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे, व त्यांचे स्वाभाविक तेज राजवाड्यांतील विलासमंदिरांत बहुतेक मंद होत चालले आहे, असें झटले असतां अतिशयोक्ति होणार नाही. ह्या मंद तेजाची एखादी लहानशी प्रकाशलहरी राजवाड्यांतून चुकून देखील बाहेर पडू नये, ह्मणून गोषाने अथवा पडद्याने चांग- लीच खबरदारी घेतली आहे !! अर्थात अशा परस्थितीत, आपल्या सद्गुणांनी सर्व जनांस वंदनपात्र होउन, कीर्तीच्या अढळ मंदिरी स- निविष्ट होणाऱ्या महाराष्ट्र स्त्रिया, विस्तीर्ण अशा वालुकामय प्रदेशांत चमकणाऱ्या सुवर्णरजाप्रमाणे किंवा मौक्तिककणाप्रमाणे अत्यंत दु- मिळ होत चालल्या आहेत ह्यांत शंका नाही अशा स्त्रिया क्वचित दृ- ष्टीस पडल्या तर त्यांचे अत्यल्प गुण देखील कौतुकास्पद वाटून, विवि- धसद्गुणमंडित स्त्रीरत्नांच्या चरित्रमालेच्या अभावी, त्यांचे पोवाडे प्रेम- भावाने गाण्यास,कोणास स्फूर्ति उत्पन्न झाली तर त्यांत नवल ते काय ? श्रीमंत महाराणी जमनाबाईसाहेब गायकवाड ह्यांचे चरित्र हे राज- कुलीन मराठी स्त्रियांच्या शेवटल्या वर्गापैकी होय. गायकवाड सर- कारचे घराणे हे शिंदे, होळकर, भोंसले ह्यांच्याप्रमाणेच इतिहासप्रसिद्ध आहे. ह्या घराण्यांत पूर्वी काही प्रख्यात स्त्रियाही होउन गेल्या अस- तील. परंतु त्यांची माहिती नसल्यामुळे त्यासंबंधाने काही लिहितां येत नाही. तथापि नुकत्याच निधन पावलेल्या महाराणी जमनाबाई साहे- ब ह्यांनी, गायकवाड घराण्यांतही कीर्तिसंपन्न, परोपकाररत, दानशूर अशा स्त्रिया निपजल्या असतील हे सिद्ध करून दाखविण्याकरितां, स्वतःचे उदाहरण जगापुढे ठेविले आहे असें ह्मणण्यास हरकत नाही.