पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या मंडळीनी छापून प्रसिद्ध केलेले ग्रंथ, १. पानपतची मोहीम. ही ऐतिहासिक कादंवरी, प्रसिद्ध ग्रंथकर्ते रा. सा. नागेश विनायक बापट यांनी तयार केली आहे. यांत सन १७६१ साली मराठे व गिलचे यांच्या दरम्यान जे घनघोर युद्ध झाले याचे वर्णन फारच मनोरंजक रीतीने केले आहे. पुस्तकाची एकंदर प्रकरणे ९१ असून ती नवरसांनी ओतमोत भरलेली आहेत. किंमत रु. ३॥ आहे. वाहेरगांवचे लोकांस टपालखर्चाबद्दल पांच आणे वेगळे पडतात. MRORE २. अर्थशास्त्र. . देशाची संपत्ति वाढेल अशा प्रकारची अनुभविक तत्वे व साधने लोकांस माहीत असणे अवश्य आहे. याच हेतूने अर्थशास्त्र अर्थात् संपत्तिशास्त्र ह्याच्या प्राथमिक तत्त्वांची ओळख व्हावी म्हणून अनेक इंग्रजी ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ रा. सा. विठ्ठल लक्ष्मण कव- ठे र बी.ए., बडोदे येथील माजि. व्ह. कॉलेजमधील अर्थशास्त्राचे प्रोफेसर यांनी तयार केलेला आहे. पुस्तकाची किंमत रु. १ आहे, बांधणी कागदी पुठ्याची. कापडीपुठ्याची सर्व बुकें संपली आहेत, बाहेरगांवचे लोकांस टपालखर्चाबद्दल दोन आणे वेगळे पडतात. ३. विषवृक्ष. (बंगाली ग्रंथाधारे तयार केलेली, मनोरंजक व बोधपर कादंबरी). बंगाल्याकडील प्रसिद्ध कादंबरीकार बाबू बंकिमचंद्र चट्टो- पाध्याय ह्यांनी रचिलेल्या कादंबरीचे हे मराठी अवतरण रा. रा. विष्णु सिताराम देव, बडोदें हायस्कूलचे असिस्टंट मास्तर यांनी तयार केले व तें सहविचारिणी सभेनें पसंत केले आहे. याची पहिली आवृत्ति पार संपून गेली. हल्ली दुसरी आवृत्ति छापली आहे. किमत पूर्वीपेक्षा कमी म्हणजे फक्त १॥ पाया. पोष्टेज .