पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाखल करण्यास प्रथमतः एकच वेळ एक रुपया प्रवेश फी भरली पाहिजे. २. कायमच्या वर्गणीदारास मंडळीचे प्रत्येक पुस्तक आठ पृष्ठास फक्त पाव आणा दराप्रमाणे किंमत आकारून पाठविण्यात येईल. बाहेर गांवच्या लोकांस पो- ष्टखर्च वेगळा पडेल. पांच ग्राहकांच्या प्रती एकत्र मागवि. णारास पोष्टखर्च मुळींच पडणार नाही. ३. कायमच्या वर्गणीदारांस जी पुस्तकें पाठवावयाची ती नेहमी मोहरेदार कागदावर छापलेली, व कापडी मज- बूत पुठ्यांत बांधलेली, ज्यांस लायब्ररी एडिशन ह्मणतात अशी पाठविण्यांत येतील. त्यांच्या पुस्तकाच्या किंमतीवर बाइंडिंग वगैरेची आकारणी मुळीच चढविली जाणार नाही. मजबूत बांधणी केली जाईल, आणि ग्रंथांत चित्रे, नकाशे, देखावे वगैरे घालावे लागल्यास त्याबद्दल मात्र दरेक चित्रा- बद्दल अर्धा आणा प्रमाणे विशेष आकार चढविला जाईल.) १. कायमच्या वर्गणीदाराकडे जे पुस्तक पाठवावयाचें तें परीक्षक मंडळीने पसंत केलेलेच पाठविण्यात येईल, व ते त्यांस नाकारता येणार नाही. सबंध वर्षांत सुमारे पांच- पांचशे पृष्ठांची तीन किंवा चारच पुस्तके तयार होऊ शकतील. त्या मानाने पाहतां कायमच्या वर्गणीदारास सालिना तीन किंवा चार रुपये फार तर भरावे लागतील. १. कायमच्या वर्गणीदारास आमच्या ऑफिसची रोज- निशी व कॅलेंडर दरसाल बक्षीस देण्यात येईल. सूचना देऊन काढून घेता येईल; परंतु पुन्हा दाखल करणे झाल्यास प्रवेशफीचा १ रुपया पुन्हा भरावा लागेल.