पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वत्र प्रसार व्हावा, व लोकांस अल्प किमतींत त्याचा लाभ घेता यावा, म्हणून ग्रंथाची किंमत होईल तितकी कमी ठेवणे. (३) या कृत्यास मदतीदाखल पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम देणारे गृहस्थ या संस्थेचे हितचिंतक व सहाहयात सभासद (लाईफ-मेंबर) गणणे, व त्यास या मंडळीच्या देखरेखीखाली जितके ग्रंथ निघतील, त्यांची एकेक प्रत (नजर) देणे. (४) ह्या उद्योगात जो फायदा राहील त्यांतील निम्मा भाग चांगल्या ग्रंथकारांच्या ग्रंथास उत्तेजन देण्याकरिता वेगळा राखून ठेवणे व निम्मा भाग भांडवलांत जमा करणे. (१) ग्रंथांची निवड करणे, आ- लेल्या ग्रंथांचे परिक्षण करणे, चांगल्या ग्रंथकारांस उत्तेजन देणे, उपयुक्त ग्रंथांचे भाषांतर करविणे, वगैरे व्यवस्था वर लिहिलेल्या मंडळींच्या विचाराने व देखरेखीखाली होईल. ग्रंथपरीक्षक मंडळी. अध्यक्ष. श्री. रा. ब, संपतराव गायकवाड, एफ्. आर. एस्. एल., एफ्. आर. जी. एस्., बरिस्ट्रर-ऍट लॉ, - सभासद रा. ब. रघुनाथ महादेव केळकर, रा. सा. शंकर मोरो रानडे, बी. ए. रा. सा. महादेव राजाराम बोडस, एम्. ए; एलएल. बी. डा. कृष्णराव विश्वनाथ धुरंधर, एल्. एम्, ऍण्ड एस्. रा. सा. बाळाजीराव जाधव, बी. ए., बी. एल. प्रोफेसर भास्कर रामचंद्र आर्ते, एम्. ए. प्रोफेसर पांडुरंग भिकाजी नाईक, बी. ए.