पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग्रंथसंपादक व ग्रंथप्रकाशक मडळी, बडोदें, - मंडळीचा उद्देश. आमच्यात पुष्कळ विद्वान व होतकरू मंडळी आहे, ग्रंथ लिहिण्याची हौसही पुष्कळांस आहे, परंतु द्रव्याचे अडचणीमुळे आणि इतर दगदगीमुळे कोणी ग्रंथ लिहीत नाहीत. कोणी लिहिलाच तर तो त्यांजकडून प्रसिद्ध होऊ शकत नाही व कोणी छापून प्रसिद्ध केलाच तर तो खप- विण्याची व खर्च केलेली रकम वसूल करण्याची दगदग सास होत नाहीं; अशा अनेक अडचणीमुळे आमच्या देशी भाषेत चांगले ग्रंथ निर्धू शकत नाहीत. ही अडचण दूर व्हावी, हा या मंडळीचा मुख्य उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी की, पुष्कळ ग्रंथप्रकाशक पुस्तकांची किंमत जबर ठेवीत असल्यामुळे त्याचा लाभ सर्वांस सा. रख्या रीतीने घेता येत नाही. ही अडचणही होईल तितकी दूर करावी असा हेतू आहे. हल्ली मंडळी आपल्या कायमच्या वर्गणीदारांस आपले ग्रंथ आठ पृष्ठांस तीन पै या दराने देते. परंतु वर्गणीदारांची संख्या दोन हजारांवर झाल्यास तीन पैंत १२ पृष्ठे सुद्धां देऊ शकेल. मंडळीचे नियम पुढील प्रमाणे आहेत. नियम. (१) लोकोपयोगी विषयांवर ग्रंथ तयार करविणे व चांगल्या ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक, शास्त्रीय, ता. त्विक, धार्मिक वगैरे विषयांवरील ग्रंथ त्यांस योग्य मोबदला देऊन हकांसुद्धा त्यांजपासून विकत घेणे, व छापून प्रसिद्ध करणे. (२) मंडळीने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथाचा