पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१३३] असते. ते काही दडुन राहिलेले नसते. अंतरंग स्वरूपाची माहिति नजिकचे झणजे जिवलग व आप्त मित्र यांसच असते. तिसरें गूढ स्वरूप; याचा साक्षी एक परमेश्वर. त्याच्याशिवाय दुसऱ्याला तें यथार्थ ठाऊक नसते, ह्मणून गूढ स्वरूपांत शिरण्याचा आह्मीं यत्न केला नाही असे समजावे. कांही लेखक स्वदेशाभिमानाच्या भरी भरून आपल्या लेखांत एककल्लीपणा आणितात. आपला देश, माणसें ब पूर्वज तेवढे उत्तम असे सिद्ध करण्यासाठी काही तरी नि- मित्तें पुढे आणितात; पण, हे ध्यानात ठेविलें पाहिजे की, स्वदेशप्रेम स्तुत्य खरें तरी इतर प्रेमाप्रमाणे तेही अंध आहे. त्यालाही मर्यादेतच ठेविले पाहिजे. ज्या अभिमानाने लो- कांत असंतोष फैलावतो तसल्या दुरभिमानांत काही अर्थ नाही. उलट, तसे करण्याने स्वदेशाचा व स्वजनाचा अप- मान मात्र होतो. त्याचप्रमाणे काही लोक आपल्या देशांत होऊन गेलेल्या प्रसिद्ध माणसांच्या थोरवीवर आपणांस विकं पाहतात, व त्यांचे यश आपणांकडे ओढन घेण्याचा यत्न करितात. आमच्या मते हेही करणे बरोबर नाही, सबब हे चरित्र लिहितांना तसला दुरभिमानही आह्मी म- नांत वागविला नाही. जे जे यथार्थ दिसले तेवढेच घेतले आहे, अयथार्थाचे ग्रहण केले नाही. असो, हे शेवटचे खंड बरेंच लांबलें सबब आतां येथेच थांबण्याची परवानगी घेतो. समाप्त.