पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निघाले पाहिजे होते. स्तुतिस्तोत्रावांचून या चरित्राला दुस- या कशाचा विटाळ होऊ द्यावयाचा नाही असा तुमचा निश्चय होता की काय? तिनें जें जें केलें तें सर्वोत्तम व स्तुल असलेच पाहिजे असा तुमचा समज आहे की काय? या चरित्रांत तिचे चित्र निघाले आहे, पण हुबेहुब तसबीर निघाली नाहीं; व तुमच्या मनाचा समतोलपणाही तीत दिसत नाही. या आक्षेपांवर आमचे असे उत्तर आहे की, या जगांत पूर्ण निर्दोष अशी एकही वस्तु नाही, व सर्व- गुणसंपन्न आणि सर्वदोषविवर्जित अशी एकही व्यक्ति मिळावयाची नाही. गुण व अवगुण यांची सर्वत्र भेळ असावयाची, हे निर्विवाद आहे. त्यांतून तारतम्याने जेथे गुणाधिक्य आढळेल तेंच मनुष्य वंदनीय व त्याचेंच चरित्र अनुकरणीय होय, असा विचार मनात ठेवून लेखकानें आपले काम संभाळून केले तरच यत्किचित् तरी लोक- हित साधलें तर साधेल. बाह्मीं जरी चरित्रनाइकेचे खासगी व दरबारी दोष गुलदस्तांत ठेविले असले तरी तसे करणे अक्षम्य आहे असे नाही. कोणी कोणाचे खासगी वर्त- नांतील दोष काढतांना फार विचार केला पाहिजे. यदा- कदाचित् कोणी हयात असतांना त्याचे छिद्रान्वेषण केले तर एकवेळ शोभेल; पण, मृत मनुष्याची केलेली निंदा कोणालाही मान्य होणार नाही. आणखी एके ठिकाणी असें झटले आहे की, थोर मनुष्याच्या चरित्राला तीन अंगें किंवा स्वरूपं असतात. पहिले बाह्य स्वरूप, दुसरें अंतरंग स्वरूप व तिसरें गूढ स्वरूप. बाह्य स्वरूप तर सर्वप्रसिद्धच