पान:कै . श्रीमंत महाराणी जनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[१३०] आता तिच्या दातृत्वाचा प्रवाह बहुतकरून देवस्थाने, तीर्थयात्रा, वर्षासने व अन्नसंतपणे अशा प्रकारच्या प्रदे- शांतून वाहत होता हे खरे आहे. तिच्या धर्मादायाचा थोडासाही भाग आधुनिक शिक्षणाच्या, किंवा इतर लोक- हितकारक कार्याच्या वांव्यास आला नाही, असे असून तिचा उदय झाला हे त्या काळच्या स्थितिविशेषाचेच फळ होय. तिच्या नांवलौकिकामुळे तिच्या गुणांचें व कर्तृत्वश- क्तीचें तेज विशेष चमकलें, हे तिच्या महतीचे कारण आहे. हे चरित्र वाचन पाहिल्यावर कोणी असा आक्षेप घे- तील की, कायहो, यांत तुझी या बाईंच्या बाह्यस्वरूपाकडे मात्र लक्ष दिले आहे. इंग्रजी चरित्रकारांच्या प्रघाताप्रमाणे तिच्या अंतस्थ स्वरूपाचें मार्मिक व यथार्थ वर्णन केलें नाही. तुही फक्त तिचे गुण घेतले आहेत, तर तिच्यांत व्यंग किंवा दोष मुळीच नव्हता की काय? तिच्या हातून प्र- माद कधीच घडला नाही असें ध्वनित केलेले भासते. जर काही दोष असले तर ते तुझांस सेव्यसेवक भावाच्या विकारानें दिसले नाहीत की काय? दोषराहित्य कोठेही सांपडावयाचें नाही, तेव्हां दुसऱ्या बाजूविषयी जाणूनबु- नन तुही मूकभाव धारण केला असें कां समजू नये? यांत मनुष्यत्वाचा भाग थोडा आढळतो. हे चरित्र फारा दिवसां- मागे होऊन गेलेल्या एकाद्या स्त्रीचे असते तर भाधार मिळाले नसतील अशी कल्पना करण्यास जागा होती; पण, जी बाई नुकतीनुकती गत झाली व जिच्या सहवा- साचा आणि भाषणाचा लाभ ज्यांना झाला होता असे अनेक लोक हयात आहेत तिचे या चरित्रचित्र यथारूप